आंबेडकरी चळवळीचे सेनापती बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे:- खासदार बाळू धानोरकर. #Chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- आंबेडकरी चळवळीला आपल्या कर्तृत्वाने जनाधार आणि प्रतिष्ठा मिळवून देणारे एक महान नेते म्हणून राजाभाऊ खोब्रागडेंचा नाव अग्रक्रमाने घ्यायला हवं. बाबासाहेबांनी स्थापलेल्या शेड्युल्ड कास्ट फेडरेशनचे सरचिटणीस आणि राज्यसभेचे उपसभापती अशी मोठी पदं भूषवलेल्या राजाभाऊंचं काम महाराष्ट्राच्या समाजजीवनात महत्त्वपूर्ण आहे. म्हणून त्यांना आंबेडकरी चळवळीचा राजा म्हटले जाते. असे प्रतिपादन खासदार बाळू धानोरकर यांनी केले. ते बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांच्या ९६ व्य जयंती निमित्य बोलत होते.
यावेळी बाळू खोब्रागडे, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते विनोद दत्तात्रय, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती दिनेश चोखारे, अश्विनी खोब्रागडे, पवन अगदारी, सुनील पाटील, यश दत्तात्रय, गोपी आदी उपस्थित होते.
बॅरिस्टर राजाभाऊ आयुष्यभर बाबासाहेबांच्या पावलावर पाऊल ठेवत फक्त जनतेची सेवा करीत आले. त्यामुळे या कुटूंबाने राजकारणातून फक्त समाजकारण केले. बाबासाहेबांचे कट्टर अनुयायी असणारे राजाभाऊ खोब्रागडे यांनी दीक्षाभूमीवरील पहिल्या धम्मचक्रप्रर्वतन दिनाचे आणि भंडा-यातील बाबासाहेबांच्या निवडणुकीचे दायित्व सांभाळले होते. दीक्षा भूमीवर शुभ्रवस्त्र परिधान करण्याची संकल्पना खोब्रागडे यांची होती. बौध्द-मुस्लीम ऐक्याचा मूलमंत्र त्यांनी सामाजिक परिवर्तनासाठी दिला होता. असे देखील यावेळी खासदार बाळू धानोरकर म्हणाले.