Click Here...👇👇👇

आठ दिवसात रस्त्याचे काम सुरू करा, अन्यथा रास्ता रोको. #Korpana

Bhairav Diwase
बांधकाम विभागाला प्रहार चा इशारा.
कोरपना:- मागील अनेक वर्षांपासून प्रतीक्षेत असलेल्या धानोरा-भोयेगव-गडचांदुर-जिवती रस्त्याचे काम सुरू झाले मात्र गडचांदुर येथील पेट्रोल पंप चौक ते माणिकगड सिमेंट कंपनीगेट पर्यंतच्या रस्त्याच्या कामाला सुरुवात झाली.
मागील एक वर्षापासून रस्त्याचे काम एकतर्फी रस्ता खोदून करण्यात येत आहे पण या मार्गाने माणिकगड सिमेंट कंपनीची अनेक जड वाहने या रस्त्याने ये जा करते व वाहतूक प्रवाशांची नेहमी वर्दळ असते अशातच एक तर्फे रस्त्याचे बांधकाम होऊन त्याचे अर्धवट काम केलेले आहे त्यामुळे आतापर्यंत अनेक अपघात होऊन अनेक जीव सुद्धा गेले व अनेक नागरिक गंभीर जखमी होऊन त्यांना अपंगत्व आले त्याकरिता येत्या आठ दिवसात कामाला सुरुवात करावी व तात्काळ रस्त्याचे बांधकाम पूर्णत्वास नेणे व एक तर्फे रस्त्यावर पडलेले खड्डे तात्काळ बुजवून रस्ता सपाट करण्यात यावा असा ईशारा प्रहार जनशक्ती पक्षाचे सतीश बिडकर, पंकज माणूसमारे,सागर गुडेल्लीवार, शैलेश विरुटकर, अरविंद वाघमारे, महादेव बिस्वास, अनुप राखुंडे सूरज बार, नितेश कोडापे, व अन्य कार्यकर्त्यांनी दिला जर काम सुरू नाही झाले तर आठ दिवसानंतर कधी पण रास्ता रोको आंदोलन करणार असे निवेदन प्रहार तर्फे कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग क्रमंक एक चंद्रपूर व सहाय्यक कार्यकारी अभियंता गडचांदुर जिल्हाधिकारी चंद्रपूर उपविभागीय अधिकारी राजुरा पोलीस निरीक्षक गडचांदुर यांना देण्यात आले.