सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा सत्कार. #Pombhurna #grampanchayat

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क पोंभुर्णा विशेष प्रतिनिधी) किशोर माहोरकर
पोंभूर्णा:- पंचायत समिती पोंभूर्णा व महाराष्ट्र ग्रामपंचायत कर्मचारी युनियन तालुका पोंभुर्णा च्या वतीने सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी सत्कार समारंभ पंचायत समितीच्या वंदनीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज सभागृह पार पडला. यावेळी सेवानिवृत्त ग्रामपंचायत कर्मचारी यांचे शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आले. #Pombhurna #grampanchayat
कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून गटविकास अधिकारी सुनीता मरस्कोले, युनीयनचे राज्याध्यक्ष तथा जिल्हा सचिव विलास कुमरवार , जिल्हाध्यक्ष धनराज कुमरे, जिल्हा संघटक संजय चौधरी, विनायक पुठ्ठावार, ठाकुरदास गव्हारे, अनिल नैताम, गणपती दिवसे, शैलेश मडावी यांची उपस्थिती होती. #Adharnewsnetwork
यावेळी गट विकास अधिकारी सुनिता मरस्कोले या मार्गदर्शन करतांना म्हणाल्या ग्रामपंचायतीत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना मोठी आवाहने असतात. अनेक रुपात त्यांना काम करावे लागते. मिटींग असो, सभा असो, पाणीपुरवठेचं काम असो, गावातील माहिती असो, घर टँक्स वसूली असो, सण असो , दिनविशेष असो ते प्रत्येक फाॅरमेटमध्ये आपलं उत्तम देत असतात. त्यांची केलेली सेवा स्मरणात राहणारी आहे. गावविकासात त्यांचे मोठे योगदान आहे. यावेळी पोंभूर्णा तालुक्यातील ग्रामपंचायत युनियन चे पदाधिकारी, सदस्य उपस्थित होते.