सिंदेवाहीत हॉकीचे जादूगार मेजर घ्यांनचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा. #Shindewahi

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) विरेंद्र का. मेश्राम, सिंदेवाही
सिंदेवाही:- सिदेवाही तालुक्याची बास्केट बॉल असोसिएशन तर्फे आयोजित सर्वोदय महाविद्यालय येथील पटांगणात बाॅस्केट बाॅल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले.त्या प्रसंगी सिंदेवाही पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.संजय पालवे,सर्वोदय महा.सिंदेवाही येथील डाॅ. लोमदेव नागलवाडे, तालुका संयोजक मा.धंनजय मोगरे, क्रिडा मागदर्शन मा.विनय खोब्रागडे ,मा.संतोष खोब्रागडे, बास्केटबॉल कोच निनाद शेंद्रे,प्रिती दोनाडकर, करीना साखरे,तथा सिंदेवाही येथील खेलो इंडिया स्पर्धेत सहभागी होणारी कु.करकाडे , प्रवीण राऊत,रोहित सोनुले,वैभव सोनकर ,सूरज ,बास्केटबॉल असोसिएशनचे पदाधिकारी उपस्थित होते. #Shindewahi
सिंदेवाही पंचायत समितीचे गटशिक्षणाधिकारी मा.पालवे साहेब यांनी उपस्थित सर्व खेळाडूंना ज्या प्रकारे आपल्या सिंदेवाही येथील कु.करकाडे या विद्यार्थ्यांनी क्रिडाप्रकारात आपला नावलौकिक केला.तसेच विद्यार्थी खेळामधुन तयार करण्यात यावे अशी अपेक्षा व्यक्त केली.स्पर्धा यशस्वी होण्यासाठी सर्वांचे सहकार्य लाभले. #Adharnewsnetwork