सार्वजनिक बांधकाम विभागाची हलगर्जी.
सिंदेवाही:- पासून निघालेल्या गडबोरी - वासेरा ह्या वर्दळीच्या रस्त्यावर वासेरा जवळील नागोबा जवळ एक मोठे भागदाड पडले असल्याने अपघात होण्याची शक्यता बळावली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळीच लक्ष देणे गरजेचे आहे. #Sindewahi
वासेरा ,- गडाबोरी - सिंदेवाही हा १० किलोमीटरचा रस्ता या भागातील नागरिकांचा दैनंदिन मार्ग आहे. सकाळी चार वाजतपासुन ते रात्री दहा वाजेपर्यंत या रस्त्यावर नेहमी वर्दळ असते. वासेरा गावाजवळ नेहमी प्रमाणे रस्त्यावर मोठा खड्डा पडला असून सिंदेवाही सार्वजनिक बांधकाम विभागाच्या हलगर्जीपणामुळे या ठिकाणी दरवर्षी खड्डा पडत असतो. तात्पुरती डागडुजी करून मार्ग सुरू केला जातो. परंतु या ठिकाणी नवीन पाईप टाकून रपटा करणे गरजेचे आहे. त्यामुळे संबंधित विभागाने याकडे त्वरित लक्ष घालून होणाऱ्या अपघातास टाळावे. अशी मागणी करण्यात येत आहे.