Click Here...👇👇👇

युवाशक्ती ग्रामविकास संघठन चंद्रपूर जिल्हाध्यक्ष पदी वैभव पिंपळशेंडे यांची नियुक्ती. #Appointment

Bhairav Diwase

नुकतीच युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघठनेचे संस्थापक अध्यक्ष श्री. इम्रान पठाण, सचिव डॉ. पुरुषोत्तम सदार यांनी चंद्रपूर जिल्ह्याची कार्यकारणी अमरावती येथे जाहीर केलेली आहे. यामध्ये चंद्रपूर जिल्ह्याच्या जिल्हाध्यक्ष पदी चेकठाणेवासना येथील सामाजिक युवा नेतृत्व तसेच गोर गरीबांच्या अडचणीत नेहमी अग्रेसर असणारे युवा ग्रामपंचायत सदस्य इंजि. वैभव पिंपळशेंडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष पदी योगेश मुर्हेकर, सचिव पदी पंचशील वाळके, कोषाध्यक्ष पदी दिनेश चौधरी, जिल्हा जनजागृती अभियान प्रमुख पदी अंकित ढेंगारे, सोशल मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी अविनाश उके, प्रिंट मीडिया प्रसिद्धी प्रमुख पदी भाऊराव घरत यांची निवड करण्यात आली.

✍🏻संडे स्पेशल... Sunday special.

http://www.adharnewsnetwork.com/2021/10/blog-post.html

💥वैनगंगा नदी पार करून आलेल्या दोन मुलीने केला पोंभूर्ण्यात हाय व्होल्टेज ड्रामा.


सदरील संघठनेच्या माध्यमातून जनतेला ग्रामपंचायतीच्या दैनंदिन करभारा विषयी माहिती देणे, शासनाच्या ज्या-ज्या योजना ग्रामपंचायतीच्या माध्यमातून राबवितात त्यांची माहिती देणे तसेच माहिती अधिकार (RTI) याबाबत जनसामान्यांमध्ये जनजागृती करून सामान्य नागरिकांचे जिवनमान उंचावण्यासाठी व युवाशक्ती ग्रामविकास संगठन, सामाजिक संघठना वाढविण्यासाठी चंद्रपूर जिल्हा कार्यकारणी गठित करण्यात आली आहे. यावेळी युवाशक्ती ग्रामविकास संगठन, महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघठनेचे संस्थापक अध्यक्ष मा. इम्रान पठाण आणि संपूर्ण पदाधिकारी यांच्या वतीने, तसेच संपूर्ण मित्र मंडळी, सहकारी मित्र, आणि संपूर्ण गावकरी यांच्या वतीने इंजि. वैभव पिंपळशेंडे यांचे सर्व स्तरावरून अभिनंदन केले जात आहे.