बीआयटीच्या प्राचार्यांकडून महिला प्राध्यापिकेचा विनयभंग. #Ballarpur

Bhairav Diwase

प्राचार्यांनी दिली पीडित प्राध्यापिकेला जीवे मारण्याची धमकी.
चंद्रपूर:- विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण मिळावे म्हणून सुरू करण्यात आलेले बल्लारपूर इन्स्टट्यूट ऑफ टेकनोलॉजी, बल्लारपूर (बीआयटी) सद्या चांगलेच चर्चेत आहे. येथील एका महिला कर्मचारीने 2 प्रचार्यांविरुद्ध विनयभंग केल्या प्रकरणी पोलीस अधिक्षकांकडे तक्रार केल्याने, शैक्षणिक वर्तुळात हा विषय चर्चेचा ठरला आहे. #Adharnewsnetwork
मायनिंग इंजिनियरिंग विभागाच्या प्राध्यापिका यांनी पोलिसांत दिलेल्या तक्रारी नुसार प्राचार्य श्रीकांत गोजे व प्राचार्य रजनीकांत मिश्रा यांनी 6 ऑक्टोबर ला अभद्र व्यवहार करीत प्राध्यापिकेचा लॅपटॉप फोडण्याचा प्रयत्न केला. याच वेळी या दोघांनी हात पकडून ओढाताण केली. यात प्राध्यापिकेच्या हाताला जखम झाली व तिचे कपडे फाडले गेले. घाबरलेल्या पिडीत महिलेने बाहेर निघून संस्था चालकांना सूचना केली पण ते बैठकीत व्यस्त होते. पिडीत महिलेने बल्लारपूर पोलीस स्टेशन गाठले, तक्रार केली पण त्याची दखल घेतली नाही. पोलिसांनी दोन्ही प्रचार्यांना चौकशी करिता बोलावले. पण नंतर पोलीस चहा पाण्यात रमले. पिडीत महिला मागील 6 वर्षांपासून कार्यरत आहे. शैलेश हा देखील पिडीत महिलेच्या पाळतीवर असतो व पिडीत महिलेने प्रचार्यांसोबत दुष्कृत्य करावे, यासाठी तो प्रयत्नशील असतो, असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक यावर काय कारवाई करतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
हा सारथी असोसिएशनचा कारनामा:- संजय वासाडे

मागील काही महिन्यांपासून येथे कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांचे सारथी असोसिएशन व्यवस्थापनाविरुध्द चुकीच्या तक्रारी करीत आहे. त्यांचा उद्देश पूर्ण होत नसल्याने त्यांनी हे कथित प्रकरण घडवून आणले. मुळात ही घटना इंटरनेटच्या जोडणीबाबत आरोप प्रत्यारोप करण्यावरून घडली. त्यावेळी प्राचार्यांनी पिडीत महिलेला इतर लोकांसमोर सुनावले. त्यामुळे ती अपमानीत झाली. या घटनेची तक्रार व्यवस्थापनाकडे पिडीत महिलेने दिल्यानंतर तिने आणखी एक तक्रार पोलिसांना दिली. पण या दोन्ही तक्रारीमध्ये नमूद करण्यात आलेले विषय कुठेही जुळत नाही. हे संपूर्ण प्रकरण सारथी असोसिएशनने घडवून आणले आहे. त्यामुळे त्यात तथ्य नाही, असे बीआयटीचे संचालक संजय वासाडे यांनी सांगितले.
बीआयटीचे प्राचार्य रजनीकांत मिश्रा यांनी दिली पीडित प्राध्यापिकेला जीवे मारण्याची धमकी....

पिडीत महिलेच्या तक्रारीनुसार तिला अनेकवेळा जीवे मारण्याची धमकी प्राचार्यानी दिली. हेच नाही तर बिहार व झारखंड येथील विद्यार्थ्यांना देशी कट्टा, पिस्तूल पण आणावयास सांगितले. यासाठी पिडीत महिलेने अश्या विद्यार्थ्यांचे मोबाइल नंबर द्यावे असेही ही प्रयत्न केले असेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.