Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

लोकप्रिय पोस्ट

नवभारत/नवराष्ट्र ग्रुप तर्फे उत्कृष्ट संस्था म्हणून चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट चा गौरव. #Saoli


सावली:- देशातील प्रसिद्ध वृत्तपत्र नवभारत/नवराष्ट्र मिडीया ग्रुप तर्फे महाराष्ट्रातील उत्कृष्ट काम करणाऱ्या सहकारी संस्था व कार्यकर्ते यांचा सन्मान या उपक्रमात चंद्रपूर अर्बन मल्टीस्टेट को ऑप संस्थेला सर्वोत्कृष्ट आर्थिक संस्था म्हणून गौरविण्यात आले.
मुबंई येथे पार पडलेल्या कार्यक्रमात आज राज्य सभेचे खासदार तथा शिवसेना नेते संजयजी राऊत, दुग्धविकास मंत्री नामदार सुनीलजी केदार व नवभारत चे संपादक निमिष माहेश्वरी यांच्या शुभहस्ते संस्थेचे अध्यक्ष रोहित बोम्मावार यांना सन्मानित करण्यात आले.
चंद्रपूर अर्बन मल्टिस्टेट ला या आधी सुद्धा सहकार क्षेत्रात उल्लेखनीय कार्या बद्दल तसेच सामाजिक क्षेत्रातील कार्याबद्दल त्यांना विविध संस्थाकडून पुरस्कार प्राप्त झाले आहे.हा पुरस्कार संस्थेच्या उत्कृष्ट कार्याचा पुरस्कार असून यासाठी संस्थेचे संचालक मंडळ, अधिकारी,कर्मचारी,सभासद यांची कठोर मेहनत आहे.तसेच ग्राहकांना योग्य सेवा देण्याचे कार्य आम्ही संस्थेचे वतीने अविरत सुरू ठेवू असे प्रतिपादन या प्रसंगी संस्थेचे अध्यक्ष रोहित बोम्मावार यांनी केले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत