जाहिरात... Advertisement... विज्ञापन

🙏 🙏

🙏 🙏✨

✌️

मिशन युवा स्वास्थ अंतर्गत चिंतामणी महाविद्यालयात कोविड लसिकरण शिबिर. #Vaccio

🟥

पोंभूर्णा:- मिशन युवा स्वास्थ अंतर्गत राष्ट्रीय सेवा योजना व तालुका आरोग्य विभाग पोंभूर्णा यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोविड प्रतिबंधात्मक लसिकरण शिबिराचे आयोजन चिंतामणी महाविद्यालयात करण्यात आले.
🟥
यावेळी तालुका आरोग्य अधिकारी डॉ.संदेश
मामीडवार, पोंभूर्णा प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.अनिकेत गेडाम, डॉ.वडपल्लीवार, सुरज डुकरे,राजेश चांदेकर,तेजस्वीनी सुत्रपवार,आयेशा मडावी, राहूल वासेकर आदींनी आरोग्य सेवा दिली.
🟥
राज्यातील अनेक विद्यार्थ्यांचे कोरोना लसीकरण व्हायचे बाकी आहे. कोरोना लसिकरण न झाल्यामुळे प्रत्यक्ष महाविद्यालयातील उपस्थितीला याचा फटका बसत आहे. म्हणून आरोग्य विभागाच्या मदतीने महाविद्यालयांमध्ये लसीकरणासाठी ‘मिशन युवा स्वास्थ्य’ मोहिम हाती घेण्यात आली. त्याचाच एक भाग म्हणून पोंभूर्णा तालुक्यातील महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचे लसिकरण करण्यासाठी चिंतामणी महाविद्यालयातून कोविड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबिराची सुरूवात करण्यात आली. या मोहिमेत बहुतांश विद्यार्थ्यांचे लसीकरण पूर्ण करण्यात आले. राहिलेल्या विद्यार्थ्यांचे पुन्हा दिवाळीनंतर लसीकरणाला प्राधान्य देण्यात येणार आहे.
🟥
यावेळी चिंतामणी विज्ञान महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.सुधीर हुंगे, चिंतामणी काॅमर्स महाविद्यालयचे प्राचार्य संघपाल नारनवरे, राष्ट्रीय सेवा योजन कार्यक्रम अधिकारी
प्रा.घोडेस्वार, प्रा. डॉ. परमानंद बावनकुळे, तसेच चिंतामणी महाविद्यालयाचे प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचारी यांचे मोलाचे सहकार्य होते. 🟥

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत