Click Here...👇👇👇

भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्ह्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन. #Chandrapur

Bhairav Diwase

चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी चंद्रपूर जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष तथा जि. प. चे माजी अध्यक्ष देवराव भोंगळे यांच्या वाढदिवसानिमित्त दि. २०, २१ नोव्हेंबर ला जिल्ह्यात ठिकठिकाणी रक्तदान शिबीर आणि सेवेच्या विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
या अंतर्गत देवराव भोंगळे मित्रपरिवारातर्फे जिल्ह्यातील घुग्घुस, बल्लारपूर, राजुरा, वरोरा, भद्रावती, कोरपना, जुनगाव, चंदनखेडा अशा आठ ठिकाणी भव्य रक्तदान शिबीर आणि २० नोव्हेंबरला पोंभुर्णा येथिल राजराजेश्वर सभागृहात भव्य मोतीबिंदू तपासणी व शस्त्रक्रिया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यासोबतच जिवती येथे सामान्य ज्ञान स्पर्धा, तोहोगाव येथे गरजूंना ब्लँकेटचे वाटप, राजुऱ्यात कार्यकर्ता स्नेहमिलन सोहळा, बल्लारपूर येथील मातोश्री वृद्धाश्रमात वृद्धांना भोजनदान, चंद्रपूरातील इंदिरानगर प्रभागात उज्ज्वला गॅस कनेक्शनचे वाटप तर उपमहापौर राहुल पावडे मित्रपरिवारातर्फे शहरातील विविध ठिकाणी उज्ज्वला गॅस, श्रमिक कार्ड, जनधन खाते, पोष्टाच्या योजना, राशनकार्ड आणि आयुष्मान भारत कार्डचे नागरिकांना वितरण करण्यात येणार आहे.
होणार्‍या कार्यक्रमांस नागरिकांसह, रक्तदाते, भाजपा, युवा मोर्चा, महिला मोर्चा तसेच सर्व आघाडीच्या च्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी मोठय़ा संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन देवरावदादा भोंगळे मित्रपरिवाराच्या वतीने करण्यात आले आहे.