सुतळी बाम्ब स्फोटात सहा जण जखमी. #Injury

Bhairav Diwase

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
कोरपना:- सुतळी बामच्या स्पोटात तीन जण गंभीर तर तीन जन किरकोळ जखमी झाल्याची घटना आज दि. १० ला सायकाळी ४.३० वाजताच्या सुमारास कोरपना तालुक्यातील पारधीगुडा येथे घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, कोरपना तालुक्यातील पारधीगुडा येथील काही व्यक्ती 64 खेळत असताना नेताजी शेरकुरे यांनी प्लास्टिक पन्नी मध्ये चार सुतळी बाम्ब घेऊन आला. त्यातून एक सुतळी बाम्ब काढून त्याने फोडला. त्याची चिंगारी उडून बाकीचे सर्व सुतळी बाम फटाके फुटले. यात तेथील रमेश पवार (४२), धनराज शेरकुरे (३५), अनिल शेरकुरे (२८) याच्या हाता-पायाला गंभीर इजा पोहचली. तर उमेश काळे (३५), रमेश शेरकुरे (१८), लहू काळे (२२) रा. पारधीगुडा हे किरकोळ जखमी झाले. ग्रामस्थांनी लागलीच त्यांना ग्रामीण रुग्णालय कोरपना येथे जखमींना दाखल केले.
यातील गंभीर जखमींना पुढील उपचाराकरता चंद्रपूर येथील जिल्हा रुग्णालयात रेफर करण्यात आले. घटनेचा पुढील तपास ठाणेदार सदाशिव ढाकणे यांच्या मार्गदर्शनाखाली कोरपना पोलीस करीत आहे.