Top News

विद्यार्थ्यांना अन्यायकारक “नवा विद्यापीठ कायदा” तात्काळ रद्द करण्याच्या मागणीसाठी भाजयुमोचे चंद्रपूरात निषेध आंदोलन. #Chandrapur

विद्यापीठांची स्वायत्तता धोक्यात आणून मलिंदा लाटण्यासाठी हा मविआ'चा नवा डाव!:- जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे

विद्यापीठाच्या कारभरात राजकीय हस्तक्षेप नको:- जिल्हाध्यक्ष विशाल निंबाळकर
चंद्रपूर:- राज्यातील महाभकास तिघाडी सरकारने विद्यापीठ कायद्यात बदल करून सार्वजनिक विद्यापीठांच्या स्वायत्तता धोक्यात आणणारा नवा कायदा विधानसभेत चर्चा न करता घाईघाईने पारित केला, हा कायदा विद्यापीठांच्या स्वायत अधिकारक्षेत्रावर गदा आणून विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गुणवत्तेवर गंभीर परिमाण करणारा आहे. त्यामुळे या कायद्याच्या विरोधात महाराष्ट्र विधिमंडळ लोकलेखा समिती अध्यक्ष आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज भैय्या अहिर, भाजपा जिल्हाध्यक्ष देवरावजी भोंगळे व महानगर अध्यक्ष मंगेशजी गुलवाडे यांच्या मार्गदर्शनात चंद्रपुर जिल्हा भारतीय जनता युवा मोर्चा ग्रामीण व महानगर यांच्या वतीने स्थानिक जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निषेध आंदोलन करण्यात आले.
महाविकासआघाडी सरकार आपल्या भ्रष्टाचारी धोरणाच्या आड घेऊन विद्यापीठांची स्वायत्तता धोक्यात आणून आता विद्यापीठातील मलिंदा लाटण्यासाठी हा नवा डाव रचत आहे. परंतु भारतीय जनता युवा मोर्चा सरकारचा हा डाव उधळून लावल्याशिवाय राहणार नाही. असे प्रतिपादन जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे यांनी आपल्या भाषणात यावेळी केले.
विधेयकामुळे प्र-कुलपती म्हणून उच्च व तंत्रशिक्षणमंत्री यांच्याकडे सर्व अधिकार जाणार आहेत. त्याचप्रमाणे कुलगुरूंच्या नावाची शिफारस सरकारच्या समितीकडून करून प्र-कुलपतींच्या परवानगीने ती दोन नावे राज्यपालांकडे पाठविणार आहेत. विद्यापीठाच्या कारभरात राजकीय हस्तक्षेप नको असे प्रतिपादन महानगर अध्यक्ष विशाल निंबाळकर यांनी आपल्या भाषणात यावेळी केले.
तसेच नवीन विद्यापीठ कायद्याच्या प्रत फाडून निषेध व्यक्त केला. यानंतर जिल्हाध्यक्ष आशिष देवतळे व विशाल निंबाळकर यांचे नेतृत्वात तसेच भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष रघुवीर अहिर यांच्या प्रमुख उपस्थितीत भाजयुमोच्या शिष्टमंडळाने जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले. तसेच हे अन्यायकारक विधेयक रद्द न केल्यास यापुढे युवामोर्चा चंद्रपूर जिल्ह्याच्या वतीने याहीपेक्षा उग्र आंदोलन करण्यात येईल असा इशाराही यावेळेस देण्यात आला.
याप्रसंगी जिला संगठन भाजयुमो मिथिलेश पांडेय,श्रीनिवास जंगम, सुनील डोंगरे, जिल्हा उपाध्यक्ष सुशांत शर्मा, मोहित डंगोर, ओम पवार, आशीष ताजने, यश बांगडे, कुणाल गुंडावर, स्नेहित लांजेवार, रामनारायण रविदास, मनोज पोतराज, राहुल पाल, अभी वांढरे, आकाश मस्के जिल्हा सचिव राहुल बिसेन, आदित्य डवरे, आकाश घुसे, सतीश तायडे, दीपक हुड, विपिन निंबालकर, सचिन गौरकार, विद्यार्थी आघाडी जिल्हा सहसंयोजक प्रतीक बरसागडे, सोशल मीडिया जिल्हा संयोजक आदित्य शिंगाडे, सचिन यामावार, मंडळ अध्यक्ष सचिन शेंडे, संजय पटेल, गणेश राम गुंडेवार, तसेच मनीष रमिला, दीपक मडावी, सुनील बोरीकर, भूपेंद्र ठाकुर,रवि रामटेके, गणेश मोहबे, सूरज पतलिया, दत्तू शिवांकर,अनुष जुमनाके, आकाश कोडापे, विष्णु मिटकारी, राहिल शेख,रोशन गौतम,साहिब चौधरी,आकाश खनके, गोपाल भट्टाचार्य, जितेंद्र आचेकर, प्रतीक मानकर, अदनान शेख, रमेश विश्वास, सूरज मंडल, गोविंद भट्टाचार्य, प्रेम सूर्यवंशी, उत्तम पासवान, चेतन चौधरी, शाहिल गायकवाड, साहिल बड़वाइक, आदित्य ठाकुर, अमन ठाकरे, निखिल रोहनकर, उज्ज्वल चैन, ऋतिक गौतम, अतिन मोजुमदार, शेख इमरान, प्रतीक सदनप्पावार, अजीम बेग, दिलीप सिमटकर , रोहित मिश्रा, हरीश माथारे, राजेश यादव, सागर भगत, शुभम निंबालकर
आदींसह जिल्ह्यातील युवा मोर्चाचे प्रमुख पदाधिकारी, महानगराचे पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने