💻

💻

व्यवहारात गणिताचे महत्त्व:- डॉ. सुधीर हुंगे #pombhurna

पोंभुर्णा:- चिंतामणी कॉलेज आॕफ सायन्स पोंभूर्णा येथे महान गणिततज्ज्ञ डॉ. रामानुजन यांचा जन्म दिवस साजरा करण्यात आला. राष्ट्रीय गणित दिन हा संपूर्ण भारतासाठी अत्यंत अभिमानाचा दिवस. आजच्याच दिवशी म्हणजे २२डिसेंबर ला महान गणिततज्ज्ञ रामानुजन यांचा जन्म झाला होता. जगभरात हा दिवस 'गणित दिन' म्हणून साजरा केला जातो. रामानुजन यांनी फक्त फक्त गणितालाच वेगळी ओळख दिली नाही, तर त्यांनी अशी काही प्रमेय आणि सूत्र दिली ज्यांचा आजही मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि जे बरेच फायद्याचे ठरतात.
दरवर्षी 22 डिसेंबरला देश रामानुजन यांच्या योगदानाची आठवण काढतो. त्यांनी फार कमी वेळातच फ्रॅक्शन, इनफायनाइट सीरिज, नंबर थिअरी, गणिती विश्लेषण या साऱ्याची सर्वांनाच माहिती दिली. गणित क्षेत्रात त्यांनी अत्यंत महत्त्वपूर्ण योगदान दिलं. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून डॉ. सुधीर हुंगे सर, प्रमुख पाहुणे डॉ. सुशिलकुमार पाठक, डॉ. विनोद कुमार हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन प्रा. अमोल गर्गेलवार यांनी केले तर प्रास्ताविक डॉ. विनोद कुमार यांनी केले तर आभार प्रा. वर्षा शेवटे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शिक्षक तथा शिक्षकेत्तर कर्मचारी व विद्यार्थ्यांचे मोलाचे योगदान लाभले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत