💻

💻

महिला व तरुणांचा युवा स्वाभिमान पक्षामध्ये प्रवेश व नियुक्ती. #rajura(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- युवा स्वाभिमान पार्टी चे जिल्हाध्यक्ष श्री.सूरजभाऊ ठाकरे यांच्या युवा नैतृत्वाला आकर्षित होऊन तथा "तरुणांना रोजगार निर्मिती व उद्योग धंद्यांकडे कल वाढविणारे व कामगारांवर होणारा अन्याय वेळोवेळी दूर करणारे जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या कार्याला प्रेरित होऊन आज दिनांक:- २२/१२/२०२१ ला युवा स्वाभिमान पार्टी राजुरा येथील जनसंपर्क कार्यालयामध्ये श्री. आशिष यमनुरवार ( शहर अध्यक्ष, राजुरा तथा तालुका समन्वयक) यांच्या पुढाकाराने सौ.सुनीता नंदलवार, श्री. राहुल मडावी तथा यांच्या सहकार्यांनी युवा स्वाभिमान पक्षात जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांच्या उपस्थितीत पक्ष प्रवेश करून आपल्या विभागातील समस्या सांगितल्या व पक्षाशी एकनिष्ठ राहून जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता जबाबदारी घेण्याची इच्छा दर्शविताच जिल्हाध्यक्ष श्री. सुरज ठाकरे यांनी सौ.सुनीता नंदलवार यांना ( बल्लारपूर महिला शहर अध्यक्ष) या पदाची जबाबदारी दिली, 


    श्री. राहुल मडावी यांना शाखाध्यक्ष रामपूर, ता. राजुरा या पदाची जबाबदारी देऊन पुढील वाटचाली करिता त्यांना शुभेच्छा देऊन जनतेच्या समस्या सोडविण्याकरिता युवा स्वाभिमान पक्ष नेहमीच तत्पर राहील असे आश्वासन दिले. या पक्षप्रवेश तथा नियुक्ती च्या कार्यक्रमात सौ. प्रियाताई झांबरे ( बल्लारपूर विधानसभा महिला आघाडी अध्यक्ष), राहुल चव्हाण, शोएब शेख ( अल्पसंख्याक अध्यक्ष ता. राजुरा ) व आदी पदाधिकारी व सहकारी उपस्थित होते.#rajura

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत