Top News

हातात विळा घेऊन त्याने रस्ता अडवल्याने उडाली तारांबळ #rajura


(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रत्नाकर पायपरे, राजुरा
राजुरा:- तहसील कार्यालयासमोर मागण्यांसाठी पाच दिवसांपासून आंदोलन करणाऱ्या एका व्यक्तीने शुक्रवारी दुपारी तीन वाजता अचानक फोटो, दोरी, ध्वज व खुर्च्या लावून रास्ता रोको आंदोलन केले.
तब्बल अर्धा तास रस्ता अडविल्याने दोन्ही बाजूने वाहनांच्या मोठ्या रांगा लागल्या होत्या. या व्यक्तीच्या हातात विळा व दांड असल्याने कुणीही त्याच्याजवळ जायला धजावत नव्हते. अखेर अर्धा तासानंतर पोलिसांनी शिताफीने त्याला पकडून पोलीस ठाण्यात नेल्यानंतर वाहतूक सुरळीत झाली.
मागील पाच दिवसांपासून राजुरा तालुक्यातील वरूर रोड येथील प्रकाश नागू निरांजने हा ५२ वर्षीय नागरिक तहसील कार्यालयासमोर पेंडाल टाकून आपल्या मागण्यासाठी आंदोलन करीत आहे.
शुक्रवारी दुपारी तीन वाजण्याच्या दरम्यान त्याने एकाकी नागपूर-हैदराबाद राष्ट्रीय महामार्गावर बौद्ध स्तुपाचे फोटो ठेवून, उंचावर तिरंगा ध्वज फडकावून संपूर्ण रस्त्यावर निळे ध्वज ठेवून व दोरी बांधून रस्ता रोखला. त्यामुळे रस्त्याच्या दोन्ही बाजूला वाहनांची रांग लागली होती.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने