💻

💻

नियंत्रण सुटल्याने ट्रॅक्टर उलटला #yawatmal

काका-पुतण्या जागीच ठार
यवतमाळ:- रोटाव्हेटर घेऊन जाणारा ट्रॅक्टर उलटल्याने काका-पुतण्या जागीच ठार झाले. हा अपघात मंगळवारी सकाळी आर्णी तालुक्यात जवळानजीक उड्डाण पुलाजवळ घडला.

📛विद्यापीठाने विद्यार्थ्यांच्या भविष्यासोबत खेळणे बंद करावे:- श्याम बोबडे
👇👇👇👇👇

राहुल अरुण जवके (२५) आणि देऊ गोलू जवके (२), अशी मृतांची नावे आहेत. मंगळवारी सकाळच्या सुमारास राहुल जवके हा रोटाव्हेटर घेऊन ट्रॅक्टरने (एमएच-२९-पीपी-६०२५) शेताकडे निघाला होता. यावेळी पुतण्या गोलू हा देखील त्याच्यासोबत होता. दरम्यान, नागपूर-तुळजापूर महामार्गावरील उडाण पुलावरून जाताना राहुलचे नियंत्रण सुटले आणि ट्रॅक्टर उलटले.
या अपघातात राहुल व त्याचा पुतण्या देऊ हे दोघेही जागीच ठार झाले. एकाच कुटुंबातील दोघे मृत्यू पावल्याने गावात शोककळा पसरली आहे. या घटनेचा अधिक तपास ठाणेदार पीतांबर जाधव यांच्या मार्गदर्शनात बीट जमादार भारती व अरुण पवार करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत