बनावट राॅबरीचा मास्टर्स माईंड दिवाणजी पोलिसांच्या ताब्यात #arrested #Theft

Bhairav Diwase
१ लाख ९२ हजार ८६५ रूपयाचा चा होता दरोडा
पोंभूर्णा:- पोंभूर्णा शहरातील देशी दारूच्या भट्टीत जमा झालेली रक्कम उमरी पोतदार गावाकडे नेत असताना भट्टीच्या दिवाणजीला घनोटी तुकूम गावानजीक चोरट्यांनी अडवून दरोडा टाकला असल्याचा बनावट प्रसंग निर्माण करून १ लाख ९२ हजार रूपयाची राबरी करणाऱ्या मास्टर्स माईंड दिवाणजीला व त्याच्या साथीदाराला अखेर सहा दिवसाच्या तपासानंतर पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत.
पोंभूर्णा शहरातील छत्रपती शिवाजी चौक परिसरात अल्का बुक्कावार यांच्या देशी दारूच्या दुकानात दिवाणजी म्हणून उमरी पोतदार येथील बंडू शंकरवार कामावर होता. भट्टीत जमा झालेल्या रक्कमेचा हिसाब किताब शंकरवार याचेकडेच असल्याने. दि.८ जानेवारी रोज शनिवारला दारू भट्टीत जमा झालेली एकूण १लाख ४ हजार ९४० रुपये व शुक्रवारची जमा असलेली रक्कम ७७ हजार ९२५ रुपये असे एकूण १ लक्ष ९२ हजार ८६५ रूपये घेऊन होंडा नावी या दुचाकीने पोंभूर्णाहून उमरी पोतदारला जात असताना रात्री पाऊणे दहाच्या सुमारास घनोटी तुकूम गावानजीक रात्रो साडे दहाच्या सुमारास तीन नकाबपोशानी लुटल्याची बनावट कहाणी सांगून.त्यांनी पोलिस व देशी दारूच्या दुकान मालकाला गुमराह केला होता.
घटनेची पार्श्र्वभूमी पाहून पोलिस विभागाने सहा दिवस कसून चौकशी केली. १३ जानेवारीला पोलिस स्टेशन उमरी पोतदारचे ठाणेदार व चंद्रपूर स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाचे उप निरीक्षक गदादे यांनी दिवाणजी बंडू शंकरवार यांची कसून चौकशी केली असता घटनेचे बिंग फुटले.
बंडू शंकरवार यांनी सदर दरोड्याचे बनावट प्रकरण स्वत:च रचल्याचे मान्य केले. यात राॅबरीतील एकूण रकमेपैकी १ लाख ३२ हजार २४० रू प्रकरणातील साथीदार मुन्ना घडसे रा.पोंभूर्णा यांचे कडून गुन्हे अन्वेषण विभागाच्या टिमनी हस्तगत केले. तर १४ जानेवारीला बंडू शंकरवार यांचे घरातून ६० हजार ६२५ रुपये उमरी पोलिसांनी हस्तगत केले.
दोघाही आरोपींना न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. पुढील तपास वरिष्ठ अधिकाऱ्यांचे मार्गदर्शनाखाली उमरी पोतदार ठाण्याचे ठाणेदार निलकंठ कुकडे करीत आहेत.