महालगाव शेतशिवारात सर्पदंशाने बैलाचा मृत्यू #death

वरोरा:- वरोरा तालुक्यातील महालगाव शेतशिवारात बैलाला ता. ०५ जानेवारी रोजी १२ वाजताच्या सुमारास सर्पदंश झाल्यानंतर उपचार न झाल्याने ३ तासानंतर मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. येन शेतीच्या कामाच्या दिवसात बैलाच्या मृत्यू मुळे शेतकऱ्याला अश्रू अनावर झाले आहे.
वासुदेव कवडू माकोडे मालकीचा बैल शेतात बांधलेला होता.परंतु , १२ वाजताच्या सुमारास बंडीने शेतात तुरी घेऊन जात असताना बैलाला सर्पदंश झाला. त्याच्या तोंडातून फेस निघत असल्याने कोणत्यातरी विषारी जातीच्या सर्पाने त्यास दंश केला. सर्पदंश झाल्यानंतर उपचार न झाल्याने ३ तासानंतर मृत्यू झाला. बैलाला सर्पदंश झाल्यानंतर डॉक्टरला संपर्क साधला असता डॉक्टर बाहेर होते. अस समजताच ते दुसऱ्या डॉक्टरला ३ तास शोधल्या नंतर सुध्दा मिळाले नाहीत. ६० हजार रुपयांचा शासनाकडून अनुदान देण्यात यावे अशी शेतकरी मांलकाची मागणी आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत