गळफास घेत युवकांची आत्महत्या

मुल:- मुल तालुक्यातील कांतापेठ येथील नितेश विलास चौधरी या युवकांने आपल्या जुन्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना बुधवारी सकाळी 10 वाजता सुमारास उघडकीस आली
मुल तालुक्यातील कांतापेठ येथील नितेश विलास चौधरी वय 26 वर्ष हा आपल्या वडिलांसोबत शेळ्या चराईला जंगलात जात होता. बुधवारी सकाळी 10 वाजता दरम्यान त्याने आपल्या जुन्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. आत्महत्ये मागील कारण अजून कळले नाही.
मृतकावर मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यासाठी मृतदेह हलविण्यात आले. पुढील तपास पोलिस करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत