शेतकऱ्यांच्या हितासाठी राज्यात जलयुक्त शिवार योजना पूर्ववत सुरू करा #chandrapur

भाजयुमो तर्फे माजी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस यांना मागणी
चंद्रपूर:- महाराष्ट्र राज्यात २०१४ नंतर देवेंद्र फडणवीस सरकारने शेतकऱ्यांच्या हितासाठी जलयुक्त शिवार अभियान योजना सुरू केली होती परंतु २०१९ नंतर स्थापन झालेल्या महाविकास आघाडी सरकारने सदर योजनेला स्थगिती देण्याचे काम करून शेतकऱ्यांच्या विकासात बाधा टाकण्याचे कार्य केले  त्यामुळे राज्य सरकारकडे जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या संदर्भात मागणी करून ही योजना पूर्ववत सुरु करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे  माजी वित्तमंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांच्याकडे केली आहे.
   
          जलयुक्त शिवार अभियान योजनेच्या माध्यमातून नाला खोलीकरण, तलाव खोलीकरण,सिमेंट बंधाऱ्याची निर्मिती करणे,शेतात ढाळीचे बांध टाकणे असे अनेक कामे सदर योजनेत करण्यात येत होते तसेच राज्यातील अनेक गावांत सदर योजना कार्यान्वित होऊन लाखो शेतकऱ्यांना फायदा झाला,जलयुक्त शिवार अभियान योजनेमुळे ग्रामीण भागातील भूजल पातळीमध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना सिंचनासाठी फायदा झाला. तसेच नाला खोलकरणामुळे पूर परिस्थितीत सुद्धा शेतकऱ्यांच्या शेतात पाणी जात नव्हते त्यामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान होण्यापासून बचाव होत होता.त्यामुळे राज्यातील कष्ठकरी शेतकरी आनंदीत होता.
        परंतु २०१९ महाविकास आघाडी सरकारने सदर योजनेला स्थगिती देण्याचे काम केले त्यामुळे राज्यातील उर्वरित गावातील शेतकरी वर्ग सदर योजनेपासून वंचित राहिला त्यामुळे सदर योजना पूर्ववत सुरु करावी अशी मागणी भारतीय जनता युवा मोर्चातर्फे माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्रजी फडणवीस यांना करण्यात आली.यावेळी प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, अमित गुंडावार,प्रदेश सचिव अनिल डोंगरे व भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत