Click Here...👇👇👇

पंतप्रधान विषयी घृणास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी आ. नाना पटोले यांच्या वर गुन्हा दाखल करा #saoli

Bhairav Diwase
माजी आमदार अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भाजपा सावलीचे पोलीस निरीक्षकांना निवेदन
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) पौर्णिमा फाले, सावली
सावली:- 17 जानेवारी रोजी भंडारा जिल्हा परिषद निवडणुकीची जाहीर सभा आटोपल्यानंतर कार्यकर्त्यांसोबत संवाद साधताना "मी मोदी ला मारू शकतो, त्यांना शिव्या देऊ शकतो" असे घृणास्पद व्यक्तव्य महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आ. नाना पटोले यांनी जाहीर रित्या केले. याप्रकरणी नाना पटोले यांच्यावर गुन्हा दाखल करून कारवाई करावी या मागणीचे निवेदन ब्रह्मपुरी विधानसभेचे माजी आमदार अतुल देशकर यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पार्टी सावली च्या वतीने पोलीस निरीक्षक शिरसाठ यांना देण्यात आले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे भारतीय जनता पार्टीचे पंतप्रधान नसून भारत देशाचे पंतप्रधान आहेत. देशातील प्रमुख पदावर असलेल्या व्यक्तीबद्दल असे घृणास्पद वक्तव्य करणे हे निंदनीय आहे. या प्रकारचे वक्तव्य करून नाना पटोले यांनी खालची पातळी गाठली असून, काँग्रेसच्या वतीने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मारण्याचा कट रचला जात आहे. हे एक प्रकारे सिद्ध केले आहे. देशाच्या पंतप्रधानांविषयी असे वक्तव्य करणाऱ्या नाना पटोले यांना अटक करावी अशी मागणी आता सर्वत्र जोर धरते आहे.
या प्रसंगी भाजपा जिल्हा संघटन महामंत्री तथा जि.प सदस्य संजय गजपुरे, भाजपा ओबीसी आघाडी जिल्हाध्यक्ष अविनाश पाल, ज्येष्ठ नेते प्रकाश गड्डमवार, जि. प सदस्य मनीषा चिमूरकर, युवा नेते प्रवीण सुरमवार, भाजपा तालुका कोषाध्यक्ष अर्जुन भोयर, पं. स सदस्य छाया शेंडे, युवा नेते निखिल सुरमवार, भजयुमो तालुका अध्यक्ष विनोद धोटे, प्रशांत वाढई, युवा नेते मोतीराम चिमूरकर, विनोद शेंडे आदि कार्यकर्ते उपस्थित होते.