Top News

मनपा हद्दीतील इयत्ता नववी ते बारावीपर्यंतच्या शाळा सोमवारपासून सुरु होणार #school #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपूर शहर महानगपालिका हद्दीतील इयत्ता 9 वी ते 12 वी चे वर्ग सोमवार दि. 31 जानेवारी 2022 पासून सुरू करण्यासाठी मनपा आयुक्त विपीन पालीवाल यांनी परवानगी दिली आहे.
शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये राज्यातील महानगरपालिका क्षेत्रात महानगरपालिका आयुक्त यांना शाळा सुरु करण्याचे अधिकार प्रदान करण्यात आलेले आहेत. दिनांक २५/०१/२०२२ रोजी झालेल्या जिल्हा टॉस्क फोर्सच्या सभेमध्ये शाळा सुरू करण्यासाठी शासनाने वेळोवेळी संदर्भातील परिपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सूचनांचे काटेकोरपणे पालन करून तसेच दिनांक २० जानेवारी , २०२२ चे परिपत्रकामधील निकष व परिशिष्ट - अ निकष देण्यात व परिशिष्ट - ब मधील मार्गदर्शक सुचनेनुसार चंद्रपूर जिल्ह्यातील इयत्ता ९ ते १२ वी चे आलेले आहे. त्यामळे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मध्ये चंद्रपूर शहर महानगरपालिका क्षेत्रातील इयत्ता ९वी ते १२ वी चे वर्ग सुरु करण्यासाठी शासनाने घेळोवेळी संदर्भाधीन परिपत्रकान्वये दिलेल्या मार्गदर्शक सुचनांचे काटेकोरपणे पालन करुन तसेच दिनांक २० जानेवारी , २०२२ चे परिपत्रकामधील निकष व परिशिष्ट अ व परिशिष्टय मधील मार्गदर्शक सुचनेनुसार चंद्रपूर शहर महानगपालिका क्षेत्रातील इयत्ता ९ ते १२ वी चे वर्ग सोमवार दिनांक ३१/०१/२०२२ पासून सुरक्षितपणे सुरु करण्यास परवानगी देण्यात आली आहे.
शाळेतील १५ ते १८ वर्ष वयोगटातील विद्यार्थ्यांचे लसीकरण शाळेत करण्यासाठी शाळेतील एक नोडल शिक्षक नियुक्त करावे आणि शाळांनी विद्यार्थ्यांचे १०० टक्के लसीकरण लवकरात लवकर पूर्ण करावे, असेही सूचित करण्यात आले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने