राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेचे भद्रावतीत धरणे आंदोलन #bhadrawati

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- दिवसेंदिवस वाढत चाललेल्या आदिवासींवरील अन्याय-अत्याचाराच्या निषेधार्थ राष्ट्रीय आदिवासी एकता परिषदेतर्फे येथील तहसील कार्यालयासमोर आज दि.२८ फेब्रुवारी रोजी एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले.
महाराष्ट्रातील सर्व तहसील कार्यालयासमोर धरणे आंदोलनाचे आयोजन करण्यात आले होते. त्यानुसार भद्रावती येथील तहसील कार्यालयासमोर युवा व बेरोजगार मोर्चाचे तालुकाध्यक्ष सूरज शिंगाडे,आर.ए.ई.पी.जिल्हा संयोजक विठ्ठल येडमे, तालुका संयोजक रचना गेडाम, राज्य उपाध्यक्ष नितेश सिडाम, ओ.बी.सी.मागास मोर्चाचे पदाधिकारी शंकर क्षीरसागर आणि इतर कार्यकर्ते धरणे आंदोलनात सहभागी झाले होते.
सदर आंदोलन हे राज्यातील दुस-या टप्प्यातील आंदोलन असून तिसऱ्या टप्प्यातील आंदोलन सर्व जिल्हा स्तरावर दि.९ मार्च रोजी होणार आहे.