Top News

'आम्ही जेलमध्ये गेलो, तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू’ राऊतांच्या वक्तव्यावर मुनगंटीवारांचा थेट प्रहार #chandrapur #Mumbai

मुंबई:- शिवसेना खासदार संजय राऊतांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेतली. ईडीसह केंद्र सरकारवर घणाघाती आरोप केले. त्यांच्या या आरोपांना भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनीही खरपूस समाचार घेतालय. आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू या संजय राऊतांच्या वक्तव्यावर तीव्र संताप व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी निशाणा साधलाय. आमच्या चुका तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालू, असं कसं चालेल, असा सवाल मुनगंटीवारांनी संजय राऊतांना विचारलाय.
राउतांची पत्रकार परिषद म्हणजे शिवसेना संपवण्याची पत्रकार परिषद आहे, अशीही टीका त्यांनी केली आहे. महाराष्ट्र आणि महाराष्ट्राचं राजकारण कोणत्या दिशेनं चाललंय, याबाबत नाराजी व्यक्त करत सुधीर मुनगंटीवार यांनी संजय राऊतांवर टीका केली.
संजय राऊत यांची पत्रकार परिषद संपल्यानंतर सुधीर मुनगंटीवार यांनी टीव्ही 9 मराठीला फोनवरुन प्रतिक्रिया देताना म्हटलंय, की, संजय राऊतांची पत्रकार परिषदेत एक वक्तव्य केलं. ते म्हणाले की आम्ही जेलमध्ये गेलो तर तुम्हालाही जेलमध्ये टाकू. याचा अर्थ काय? म्हणजे आमच्या तुम्ही पोटात घाला आणि तुमच्या चुका आम्ही पोटात घालू, असं कसं चालेल? सामान्य माणूस कोणताही स्वार्थ न बाळगता मतदान करतो, आणि तुम्ही पत्रकार परिषद घेऊन तुम्ही सौदेबाजी करता… हे आश्चर्यजनक आहे… महाराष्ट्र कोणत्या दिशेनं चाललंय.. सुडाच्या राजकारणाचा विषय जाऊ दे हो..जेव्हा भुजबळांना अटक केली, ते सुडाचं राजकारण होतं..आता तु्म्ही त्यांच्या मांडीला मांडी लावून बसलाय…याचा काय अर्थ? धमक्या द्यायच्या आणि धमकावलंय…एवढंच सुरु आहे. यातून शिवसेनेचा जो दबदबा होता, तो संपत चाललाय. बाळासाहेबांची शिवसेना संपवणारी ही पत्रकार परिषद आहे… 80 टक्के समाजकारण आणि 20 टक्के राजकारण, म्हणणारी शिवसेना आता 100 टक्के राजकारण घुसली आहे. #साभार

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने