पोलीस ठाण्यात कॉंग्रेस कार्यकर्त्यांला उठाबशा घालून मागायला लावली माफी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला भाजयुमो चा दणका
ब्रम्हपुरी:- ब्रम्हपुरी येथील कांग्रेस कार्यकर्ता राकेश कुर्झेकर याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबाबत आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट केल्याने जनतेच्या भावना दुखावल्या गेल्याने भारतीय जनता युवा मोर्चा ब्रम्हपुरीच्या कार्यकर्त्यांनी न्यायिक मार्गाचा अवलंब करीत पोलीस स्टेशन ब्रम्हपुरी येथे रितसर तक्रार दाखल केली.
पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्याविषयी आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट करणाऱ्या काँग्रेस कार्यकर्त्याला भाजयुमोने दणका दिला आहे. भाजपा आणि भाजयुमोच्या कार्यकर्त्यांनी काँग्रेस कार्यकर्ता राकेश खुर्जेकर याच्याविरुद्ध ब्रह्मपुरी पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. ब्रम्हपुरी पोलिस स्टेशन येथे उठाबशा करीत, जनतेची जाहीर माफी मागत यापुढे अशी चूक करणार नाही असे रडकुंडीला येत राकेश कुर्जेकर याने माफी मागितल्याने मोठ्या मनाने भारतीय जनता युवा मोर्चा च्या कार्यकर्त्यां तर्फे सदर व्यक्तीला माफी देत "यापुढे अशी चूक होणार नाही" अशी तंबी देण्यात आली. सोशल मीडियावर उठाबशा काढतांना आणि माफी मागत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झालेला आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत