भाजयुमो मध्य बाजार मंडळ अध्यक्ष गणेश रामगुंडेवार यांना समाजभूषण पुरस्काराने सन्मानित #chandrapur

चंद्रपूर:- चंद्रपुर कुंभार समाजातर्फे समाजकार्यात उल्लेखनीय कार्य करणारे सेवक यांना प्रतिवर्षी समाज भुषण पुरस्कार सन्मानित केले जात असे. लॉकडॉउन काळामध्ये कोरोना च्या पहिल्या लाट मध्ये 46 दिवस चंद्रपूर शहरातील विविध भागांतील सामान्य दिंनदुबळ्या 500+ नागरिकांना दररोज घरपोच अन्नदान, व दुसऱ्या लाट मध्ये 38 दिवस सतत शासकिय रुग्णालयात तसेच वैद्यकीय महाविद्यालय येथील रुग्णाचे नातेवाईक तसेच गरजूंना फळ, नाश्ता, चहा, बिस्कीटे वाटप करून समाजाप्रती आपले कर्तव्य पूर्ती करण्याचे सेवाभावी कार्य करण्यात आले.
  सामान्य व्यक्ती हा जगला पाहिजे आणि यासाठी आपण माणुसकी जपली पाहिजे हा विचार ठेऊन गरजूंना पाठबळ दिल्याबद्दल आणि दुसऱ्या लाटेमध्ये शासकीय रुग्णालयात रक्ताची टँचाई भासत असतांना कुठलीही दिरंगाई न करता रक्तदान शिबीर चे आयोजन करून 50+ आणि जमेल त्या पद्धतीने रक्त दान सेवा हे सर्वश्रेष्ठ कार्य आहेत या हेतूने कार्य केल्या बदल कुंभार समाजातील युवा समाज सेवक गणेश रामगुंडेवार यांना २०२१ चे समाज भूषण या पुरस्कारने सन्मानित करण्यात आले.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत