Top News

सावली न.पं. चा नगराध्यक्ष १७ फेब्रुवारी रोजी ठरणार #saoli #saolinews

सावली नगरपंचायतींच्या नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष पदासाठी निवडणूक कार्यक्रम गुरुवारी जाहीर झाला होता. ११ फेब्रुवारी रोजी या दोन्ही पदासाठी निवडणूक होणार होती. परंतु, भारतरत्न लता मंगेशकर यांच्या निधनाने ७ फेब्रुवारी रोजी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आल्याने निवडणूक कार्यक्रम पुढे ढकलण्यात आला आहे. सुधारित कार्यक्रमानुसार ही निवडणूक १७ फेब्रुवारी रोजी होणार असून, नगराध्यक्ष निवडणुकीकडे सावलीवासीयांचे लक्ष लागले आहे.
नगरपंचायतींमध्ये निवडून आलेल्या सदस्यांना संबंधित पदांसाठी ११ फेब्रुवारी रोजी दुपारी २ वाजेपर्यंत नामनिर्देशन पत्र भरता येणार आहे. दुपारी २ नंतर पिठासीन अधिकारी अर्जांची छाननी प्रक्रिया पार पाडतील. १६ फेब्रुवारी रोजी दुपारी ४ वाजेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेण्यासाठी मुदत दिली जाईल. तर १७ फेब्रुवारी रोजी सकाळी ११ ते दुपारी ४ वाजेपर्यंत विशेष सभेत
सावली नगराध्यक्ष पदाची निवड करण्यात येईल. १७ फेब्रुवारी रोजी दुपारी १० ते १२ वाजेपर्यंत उपनगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी दाखल केली जाणार आहे. नगराध्यक्ष पदाची निवडणूक प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पीठासन अधिकारी अर्जाची छाननी करतील. वैध उमेदवारांची नावे वाचून दाखविल्यानंतर १५ मिनिटाच्या आत उमेदवारी मागे घेण्यास मुदत मिळेल. नंतर उपनगराध्यक्ष पदाची निवड जाहीर करण्यात येईल.
सावली नगरपंचायत काँग्रेसचे सर्वाधिक १४ नगरसेवक निवडून आले आहे. भाजपाने ३ जागा जिंकल्या आहेत. काँग्रेसचा नगराध्यक्ष होणार हे निश्चित असले तरी कोणाच्या गळ्यात नगराध्यक्षपदाची माळ पडते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मूलचे उपविभागीय अधिकारी महादेव खेडकर पीठासीन अधिकारी असतील तर मुख्याधिकारी मनीषा वजाळे या सहकारी असणार आहेत.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने