Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

बिबट्याच्या अवयवांची तस्करी, ब्रम्हपुरीतील आरोपीला अटक #Leopard #organ #smuggling, accused #arrested in #Bramhapuri

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
नागपूर:- बिबट्याची नखे, दात आणि मिशा या अवयवांची तस्करी करणाऱ्या चंद्रपूर जिल्ह्यातील आरोपीला नागपूर व भंडारा वन विभागाच्या संयुक्त पथकाने अटक केली आहे. रंगनाथ शंकर मातेरे असे या आरोपीचे नाव असून तो बोरगाव (ता. ब्रह्मपुरी, चंद्रपूर) येथील रहिवासी आहे. पथकाने त्याच्याकडून बिबट्याच्या २१ मिशा, २१ नखे आणि १२ दात जप्त केले. यात चार सुळे दातांचाही समावेश आहे.
भंडारा वनविभागातील पवनी वनपरिक्षेत्रातील सावर्ला या गावात या अवयवांची तस्करी होणार असल्याची गुप्त माहिती पथकाला मिळाली होती. या माहितीवरून नागपूर आणि भंडारा वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी संयुक्त पथक तयार केले आणि सापळा रचून रंगनाथ मातेरे याला ताब्यात घेतले. त्याच्याकडून अवयव जप्त करण्यात आले आहे. आरोपीविरुद्ध वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ च्या विविध कलमांनुसार गुन्हा नोंदवून अटक करण्यात आली.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत