Propose Day ला वाद, कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांच्या दोन ग्रुपमध्ये तुफान हाणामारी
नाशिक:- विद्यार्थ्यांच्या दोन गटात तुफान हाणामारी झाल्याचा प्रकार समोर आला आहे. नाशिक जिल्ह्यातील कॉलेज कॅम्पसमध्ये ही घटना घडली. सध्या सगळीकडे व्हॅलेंटाईन डे साजरे होत आहेत. अशात प्रपोज डे दिवस साजरा होत असताना ही हाणामारी झाली. विद्यार्थ्यांच्या दोन गटात काही कारणावरून वाद झाला. भांडणाचे रूपांतर फ्री स्टाईल हणामारीत झाले आहे.
नाशिक जिल्ह्यातील निफाड गावात कॉलेज कॅम्पसमध्ये दोन गटात हाणामारी झाली. यामध्ये काही विद्यार्थी अक्षरशः तुडव-तुडव हाणामारी करतांना दिसत आहेत. या घटनेचा व्हिडिओ काही लोकांनी आपल्या इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केला आहे. या मारहाणीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, कॉलेजमध्येच तरुणांच्या मारामारीमुळे कॉलेजच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
सध्या व्हॅलेंटाइन डेच्या पार्श्वभूमीवर तरुणांमध्ये विविध ‘डे’ साजरे केले जात आहेत. मंगळवारी प्रपोज डेच्या दिवशी विद्यार्थ्यांच्या दोन गटात काही कारणावरून वाद झाले. वादाचे रुपांतर हाणामारीत झाले. नाशिक जिल्ह्यातील निफाड गावातील महाविद्यालय परिसरात ही घटना घडली. कॉलेजमध्ये अनेकदा अशी छोटी-मोठी मारामारी होत असते. नाशिकमध्ये विद्यार्थ्यांच्या भांडणाचा व्हिडिओ समोर येण्याची ही पहिलीच वेळ नाही.
सुरुवातीच्या वादानंतर दोन्ही गटांमध्ये फ्री स्टाईल हाणामारी झाली. त्यानंतर काही लोक अक्षरशः एकमेकांना तुडव-तुडव-तुडवल्याचं पाहायला मिळालं. कुठल्या मुलीला प्रपोज करण्यावरुन वाद झाला हे अद्याप समजलेले नाही. तसेच विद्यार्थी गंभीर जखमी झाले आहेत की नाही हे देखील लगेच स्पष्ट झाले नाही. मात्र कॉलेजमध्येच विद्यार्थ्यांमध्ये एवढ्या मारामारीमुळे कॉलेजमधील सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्न उपस्थित होत आहेत.