Top News

पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात येऊन ५८ वर्षीय महिलेवर बलात्कार. A #58-year-old #woman was #raped on the pretext of asking for #water

नागपूर:- चाकूचा धाक दाखवून ५८ वर्षीय महिलेवर बलात्कार केल्याची घटना उघडकीस आली. महिलेने दिलेल्या वर्णनाच्या आधारे पोलिस आरोपीचा शोध घेत आहेत.
याबाबतची अधिक माहिती अशी की, मंगळवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास ५८ वर्षीय महिला घरात एकटीच होती. दोघे जण पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात शिरले. यानंतर दोघांनी महिलेला चाकूचा धाक दाखवून तिच्यावर बळजबरीने बलात्कार केला. यानंतर महिलेला धमकी देऊन आरोपी पसार झाले.
बुधवारी सकाळी पीडितेने शेजार्‍यांना घडलेली सर्व घटना सांगितली. यानंतर घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी मिळाल्याने घटनास्थळी धाव घेतली. पोलीस अधिकारी नवीनचंद्र रेड्डी आणि विनिता साहू हे घटनास्थळी पोहोचले. महिलेच्या वैद्यकीय तपासणीनंतर रात्री उशिराने अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. भीतीपोटी काहीजण तक्रार करत नाहीत. त्यामुळे आरोपींची हिंमत आणखी वाढते असे पोलीसांनी सांगितले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने