'पावनखिंड' चा ट्रेलर....! "हर हर महादेव" #Pawankhind

Bhairav Diwase
0

उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार, इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे 'पावनखिंड' चे ट्रेलर! हर हर महादेव
पावनखिंड' (Pawankhind movie) या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज झाला आहे. हर हर महादेवच्या जयघोषाने हा ट्रेलर इन्स्टाग्रामवर शेअर करण्यात आला आहे.
दिग्पाल लांजेकर यांनी पावनखिंड हा चित्रपट दिग्दशिर्त केला आहे. या चित्रपटात मृणाल कुलकर्णी, चिन्मय मांडलेकर, प्राजक्ता माळी, अंकित मोहन, क्षिती जोग, अजय पूरकर, समीर धर्माधिकारी, शिवराज वायचळ यांच्या भूमिका आहेत.
दिग्पाल लांजेकर यांनी सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर केलीय. पावनखिंडचा ट्रेलर रिलीज झाल्याची माहिती त्यांनी दिलीय. त्यांनी कॅप्शनमध्ये लिहिले आहे- उपसून तलवार, कधी झेलून वार, त्या रात्री सहाशे वीर, झाले जीवावर उदार ,इतिहासातल्या अभूतपूर्व लढाईची झलक, सादर आहे 'पावनखिंड' चे ट्रेलर! हर हर महादेव'.
चित्रपटाची निमिर्ती अजय आरेकर, अनिरूद्ध आरेकर आणि भाऊसाहेब आरेकर यांनी केली आहे. लेखन दिग्पाल लांजेकर यांचेच आहे. चित्रपटाचा दमदार ट्रेलर आहे. त्यामळे प्रक्षकांना हा ट्रेलर पाहून चित्रपटाची उत्सुकता लागून राहिलीय. हा चित्रपट १८ फेब्रुवारीला रिलीज होतोय. हा ट्रेलर मोठ्या प्रमाणात पाहिला जात आहे. तसेच प्रेक्षकांनी चित्रपटाच्या दमदार ट्रेलरचे कौतुक केले आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0टिप्पण्या

टिप्पणी पोस्ट करा (0)