Top News

'हे' तर प्रहारच्या आंदोलनाचे यश:- सतीश बिडकर #Korpana

माणिकगड रस्त्याच्या कामाला सुरुवात
कोरपना:- राजुरा विधानसभा क्षेत्रात अनेक रस्त्यांची कामे मंजूर असून कंत्राटदार व बांधकाम विभागाच्या दुर्लक्षामुळे कामामध्ये दिरंगाई होत आहे. पेट्रोल पंप चौक ते माणिकगड गेट या रस्त्याचे काम सुरू व्हावे म्हणून प्रहारचे सतीश बिडकर यांचे नेतृत्वात आंदोलन करण्यात आले होते. दरम्यान गेल्या वर्षभरापासून रस्ता खोदून असून काम ठप्प होते. यावर स्थानिक आमदार यांनी वर्षभरात अवाक्षरही काढला नाही. त्यावेळी प्रहारने सार्वजनिक बांधकाम विभागाशी सातत्याने पाठपुरावा केला असून पत्र व्यवहार देखील उपलब्ध आहे. दोन दिवसांआधी गडचांदूर येथील माणिकगड चौक ते संत जगनाडे महाराज चौक रस्त्याच्या कामाला सुरुवात झाल्याने नागरिकांनी आनंद व्यक्त केला.
प्रहारचा रास्ता रोको अन् अधिकाऱ्यांत धडकी
👇👇👇👇👇👇

प्रहारने केलेल्या पाठपुराव्यामुळे काम सुरू होणार असे सार्वजनिक बांधकाम विभागाने पत्राद्वारे प्रहारचे माजी तालुकाध्यक्ष सतीश बिडकर यांना कळवले. मात्र या कामाचे श्रेय घेण्यासाठी आमदार साहेब सरसावले की काय असा प्रश्न प्रहारने उपस्थित केला आहे. वर्षभर गप्प असणारे नेते ऐन काम सुरू होण्याच्या दोन दिवस आधी काम सुरू करण्याचा इशारा देतात आणि काम सुरू झाले म्हणून पेपरबाजी करतात हे दुर्दैवच. वर्षभरात अनेकांचे अपघात झाले. लोकप्रतिनिधी, कंत्राटदार व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या संगनमताने कामास विलंब झाला आणि प्रहारच्या आंदोलनाने काम सुरू झाले असेही बिडकर म्हणाले.

आता सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी व लोकप्रतिनिधी यांनी सतत कामांवर लक्ष ठेवून असावे. दर्जाहीन कामे झाल्यास संबंधितांना जबाबदार समजून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा प्रहार पक्षाने दिला आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने