Top News

बैलगाड्यांसह लाकूड तस्करांची टोळी वनविभागाच्या ताब्यात #Wood

(आधार न्यूज नेटवर्क मुख्य उपसंपादक) ॲड. राहुल थोरात
गडचिरोली:- वनसंपत्तीने परिपूर्ण असलेला गडचिरोली जिल्ह्यात अति उच्च प्रतीच्या सागवान लाकडाचे उत्पादन होते. तर, या सागवानाच्या सुरक्षेसाठी मोठ्या प्रमाणात वन विभागाचे कर्मचारी तैनात असतात. परंतु, तरीसुद्धा या भागात मोठ्या प्रमाणात लाकडांची तस्करी केल्या जाते. ही तस्करी तेलंगणा राज्यात केली जाते. गडचिरोलीच्या जंगलातून लाकूड तोडून ते लाकूड तेलंगणात नेत असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. आलापल्ली वन परिक्षेत्रात एक पथक गस्तीवर होते. तेव्हा त्यांनी या तस्करांवर कारवाई करत त्यांना अटक केली आहे.
ही घटना काल रात्रीच्या सुमारास घडली. यात तब्बल ८ लाख ५० हजार रुपयांची सागवान लाकडे जप्त करण्यात आली आहे. ही लाकडे सहा बैलगाड्यांच्या साहाय्याने तेलंगणात नेण्यात येत होती. यात सहा बैलगाड्या हाकणारे आणि बारा बैलांना अटक करण्यात आली आहे. यात मोठ्या प्रमाणात सागवान वृक्षांची कत्तल करण्यात आली आहे. या प्रकरणातील काही आरोपी फरार असल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. तरी, त्यांचा शोध घेतला जाणार आहे. एवढ्या मोठ्या अवैध तस्करीला आळा घालण्यात आम्ही यशस्वी झाल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी योगेश शेरेकर यांनी दिली. या कारवाईचे नेतृत्व वनपरिक्षेत्र अधिकारी शेरेकर यांनी केले आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने