मतदारांचा प्रतिनिधींवर अंकुश असावा:- रविदादा मानव #bhadrawati

Bhairav Diwase
(आधार न्यूज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) जितेंद्र माहुरे भद्रावती
भद्रावती:- जगातील सर्वात मोठी लोकशाही असलेला देश हा भारत देश असून या देशाने लोकशाहीचे स्वरूप स्विकारले आहे. यामध्ये मतदार हा देशाचा मालक म्हणून मतदान करतो आणि आपला प्रतिनिधी निवडतो. या निवडून दिलेल्या प्रतिनिधीवर मतदारांचा अंकुश असला पाहिजे असे प्रतिपादन सुप्रसिद्ध राष्ट्रीय व्याख्याते तथा गुरुकुंज मोझरीचे अध्यक्ष रवीदादा मानव यांनी केले.
ते वरोरा येथील आनंदवन चौकात सेवा गृप तर्फे आयोजित शिवजयंती तथा तीन दिवसीय समारोपीय समारंभात बोलत होते. ते पुढे म्हणाले की, निवडून आलेले प्रतिनिधी हे लोकसभा, विधानसभा, जिल्हा परिषद, पंचायत समिती व ग्रामपंचायतचा सदस्य होतात. हे प्रतिनिधी आपआपल्या क्षेत्रात मतदारांच्या सेवार्थ सभागृहामध्ये प्रतिनिधीत्व करतात. त्यामुळे मतदारांचे काम मतदान करून संपत नसून प्रतिनिधींवर अंकुश असला पाहिजे. डीजे वाजून शिवजयंती साजरी होत नसते तर शिवरायांचे विचार उराशी बाळगुन समाजात परिवर्तन होण्यासाठी संघर्ष उभा करावा लागतो व या संघर्षातून लोकशाही टिकावी व बळकट व्हावी अशा पध्दतीचे कार्य करूनच खरी शिवजयंती साजरी करता येईल. असेही ते यावेळी म्हणाले. यावेळी केंद्रीय मानवाधिकार संघठन नवी दिल्लीचे विदर्भ प्रदेश अध्यक्ष डॉ.अंकुश आगलावे यांनी शिवाजी महाराजांच्या जीवनकार्यावर प्रकाश टाकला.
या शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने रक्तदान शिबिर व रोगनिदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.कार्यक्रमाचे प्रास्ताविक किसान पुत्र संघटनेचे नरेंद्र जीवतोडे यांनी केले. यावेळी ग्रामगीताचार्य प्रा.कावळे सर, भाउऊराव वैद्य गुरूजी,बघेल ठेकेदार, टिपले सर, रमेश राजुरकर तसेच सेवा ग्रुपचे अध्यक्ष निखिल मांडवकर , उपाध्यक्ष कृष्णा ढोके, सचिव वैभव ठाकरे, सहसचिव महेश बिबटे , कोषाध्यक्ष अजिंक्य अंबाडे, व वैभव कोवे, तेजस चहांदे, महेश डेंगळे , मोनेश भोयर , देवेंद्र देठे, रूपेश चिंचोलकर , रोहित मेश्राम, अक्षय नागापूरे व समस्त सेवा ग्रुपचे फाऊंडेशचे सदस्य, शिवभक्त व अनेक नागरिक उपस्थित होते.