(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- सेवा सहकारी संस्था मुधोली (तुकूम) येथील अध्यक्ष व उपाध्यक्षाच्या निवडीसाठी रविवार, २७ मार्च रोजी सभा पार पडली. यामध्ये गण्यारपवार गटाचे रमेश भसारकर यांची अध्यक्षपदी तर उपाध्यक्षपदी नामदेव सरपे यांची निवड करण्यात आली.
तिमाडे, भैय्याजी देवतळे, गंगाराम झाडे, नामदेव वर्धलवार, कुसूम मुरमाडे, सुमन गावडे हे निवडून आले आहेत. निवडणुकीसाठी यशवंत भुरमाडे, भीमराव डोंगरे, शैलेश डोंगरे, रवींद्र दुधे, तुळशीराम दुधे, कवडू दुधे, सोनम कातकर, तिरपंत ताकसांडे, भीमराम ताकसांडे, बुधा गोंगले, माणिकराव कुसनाके, गोविंदा झाडे, बाजू गेडाम, प्रकाश तोरे, लुलाराम मकलवार, रामदास मडावी, नेमाजी सरपे, परशुराम सरपे, दिवाकर कळसकर, वसंत सरपे आदींसह कार्यकर्त्यांनी सहकार्य केले.
नवनिर्वाचित पदाधिकारी व सदस्यांचे कृषी उत्पन्न बाजार समिती चामोर्शीचे सभापती अतुल गण्यारपवार, संचालक अरुण बंडावार, सुधाकर निखाडे, अमोल गण्यारपवार, सुरेश परसोडे, भाग्यश्री चिंतलवार, सुधाकर गडे यांनी अभिनंदन केले आहे.
• सेवा सहकारी संस्था मुधोली (तुकूम) येथे रमेश भसारकर, नामदेव सरपे, हुलका देवतळे, विजय फुलझेले, शबीर खाँ दिलावर खाँ पठाण, बाबुराव नागापुरे, पत्रू कडते, जोगेश्वर तीमाडे