शब्दांना नसते दुःख
शब्दांना सुखही नसते
ते वाहतात जे ओझे
ते तुमचे आमचे असते...
जरा विसावू या वळणावर....
कसे कोठुनी येतो आपण
कसे नकळता जातो गुंतून
उगाच हसतो, उगाच रुसतो
क्षणात आतुर, क्षणात कातर
जरा विसावू या वळणावर....
कधी ऊन तर कधी सावली
कधी चांदणे कधी काहिली
गोड करूनिया घेतो सारे
लावुनिया प्रीतीची झालर
जरा विसावू या वळणावर...
खेळ जुना हा युगायुगांचा
रोज नव्याने खेळायाचा डाव
रंगला मनासारखा कुठली
हुरहूर कसले काहूर
जरा विसावू या वळणावर.....
प्रेमात तुझे नी माझे नाते
आयुष्यात शेवटी जुळून आले
प्रेमात पडलं की सारेच गाते
तुझी आठवण येते आहे
तुझे नी माझे जुळले नाते
जरा विसावू या वळणावर.....