Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

संतापजनक! ११ वर्षीय मुलीवर वडीलांसह भाऊ, आजोबा अन् मामाकडून बलात्कार #rape

पुणे:- रक्तातील नात्याला काळीमा फासणारी घटना शहरात समोर आल्याने संताप व्यक्त केला जात आहे. एका ११ वर्षाच्या मुलीवर तिचे वडील, अल्पवयीन भाऊ, आजोबा, चुलत मामा अशा चौघांनी लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी २९ वर्षाच्या एका समुपदेशक महिलेने बंडगार्डन पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार पीडित मुलीचे वडील, भाऊ, आजोबा, चुलत मामा यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका शाळेत ११ वर्षाची ही पीडित मुलगी शिकत आहेत. फिर्यादी महिला या समुपदेशक म्हणून काम करतात. विद्यार्थिनींना मार्गदर्शन करण्यासाठी त्या शाळेत गेल्या होत्या. मुलींना त्या 'गुड टच, बॅड टच' याविषयी समाजावून सांगत होत्या. त्यावेळी या मुलीने आपल्यावर गेल्या ४ वर्षापासून झालेल्या अत्याचाराची माहिती दिली. २०१७ मध्ये बिहारमध्ये असताना तिच्या वडिलांनी घरात कोणीही नसताना तिच्यावर जबरदस्तीने शारीरिक संबंध करण्याचा प्रयत्न केला होता.
त्यानंतर नोव्हेबर २०२० मध्ये ताडीवाला रोड येथे असताना तिच्या १४ वर्षाच्या मोठ्या भावाने तिच्याबरोबर अनेक वेळा जबरदस्तीने शारीरिक संबंध ठेवले. जानेवारी २०२१ मध्ये तिचे आजोबांनी तिच्याशी गैरवर्तन केले. तर मे २०२१ मध्ये तिचा चुलत मामाने तिच्याबरोबर गैरवर्तन केले आहे. बंडगार्डन पोलिसांनी या प्रकरणी चौघांवर गुन्हा दाखल केला असून सहायक पोलीस निरीक्षक सविता सपकाळे तपास करीत आहेत.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत