Top News

भरधाव वेगात टायरने केला घात #accident

गाडी झाडावर आदळली अन् वृध्द महिलेचा जागीच मृत्यू
भंडारा:- भरधाव वाहनाचे टायर फुटल्याने अनियंत्रित गाडी झाडावर आदळून भंडाऱ्यात भीषण अपघात झाला आहे. या अपघातात वृद्ध महिलेचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दोन चिमुकल्यांसह पाच जण गंभीर जखमी झाले आहे. जखमींना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. भंडारा जिल्ह्याच्या गडचिरोली- साकोली मार्गावरिल दांडेगाव फाट्याजवळ हा अपघात घडला आहे.
शालिनी चिंचेकर या 70 वर्षीय महिलेचा मृत्यू झाला असून अभिषेक चिंचेकर (वय 27), कल्पना चिंचेकर (वय 44), प्रियंका काटनकर (वय 29), हित काटनकर (वय 4) सोनायना काटनकर वय दीड वर्ष असे गंभीर जखमींचे नाव आहेत. तर पाच जण गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांना ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे दाखल करण्यात आले आहे.
गडचिरोली येथील रहिवासी अभिषेक चिंचेकर हा स्वतःच्या चारचाकी कार मारुती व्हॅगनारने आपल्या परिवार व नातेवाईक सोबत साकोलीकडे जात होता. दरम्यान, लाखांदूर-साकोली महामार्गावरील दांडेगाव फाट्याजवळ अचानक गाडीचा उजव्या बाजूचा टायर फुटल्याने गाडी मार्गाच्या लगत असलेल्या झाडाला आदळली.
हा अपघात इतका भीषण होता की, यात गाडीच्या समोरील भाग चक्काचूर झाला. या अपघातात 70 वर्षीय वृद्ध महिला शालिनी चिंचेकर हिचा घटनास्थळीच मृत्यू झाला. तर 5 जण गंभीर जखमी झाले आहे.
घटनेची माहिती पोलिसांना मिळताच घटनास्थळी पोहोचून घटनेचा पंचनामा करंत जखमींना ग्रामीण रुग्णालय लाखांदूर येथे उपचाराकरिता हलविण्यात आले मात्र जखमींची प्रकृती चिंताजनक असल्याने पाचही लोकांना ब्रह्मपुरी येथील ख्रिस्तानंद रुग्णालयात हलविण्यात आले आहे

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने