Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

प्रेमाचा कैफ, दारूची नशा अन् तो इमारतीवरून पडला खाली #death

नागपूर:- दारूच्या नशेत टुन्न असताना त्याला प्रेमाचा कैफ चढला. मध्यरात्री तो आपल्या मैत्रिणीसोबत फोनवरून गप्पा करू लागला. धोक्याच्या ठिकाणी आहोत, याचे त्याला भानच उरले नाही अन् तो इमारतीवरून खाली पडला. गंभीर जखमी झाल्यामुळे उपचारादरम्यान त्याचा करुण अंत झाला. सूरज जितेंद्रकुमार जंगेला (वय २५) असे संबंधित तरुणाचे नाव आहे.
वाहनचालक म्हणून काम करणारा सूरज नंदनवनमधील देशपांडे ले-आऊटमध्ये एका इमारतीत राहत होता. पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे त्याला दारूचे व्यसन होते. गुरुवार-शुक्रवारच्या रात्री दारूच्या नशेत सूरजने त्याच्या मैत्रिणीला फोन लावला. तिसऱ्या माळ्यावर इकडे तिकडे फिरत तो मैत्रिणीसोबत गप्पा करू लागला. बोलताना आपण धोक्याच्या ठिकाणी आहोत, याचे भानच त्याला उरले नव्हते. बोलता बोलता तो तिसऱ्या माळ्यावरून खाली पडला. त्याची किंकाळी ऐकून आजूबाजूची मंडळी धावली.
यानंतर, सूरज जंगेलाला रुग्णालयात दाखल करण्यात आले. तेथे उपचार सुरू असताना शनिवारी सकाळी ९.४४ ला डॉक्टरांनी सूरजला मृत घोषित केले. मिळालेल्या माहितीवरून नंदनवन पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली. पुढील तपास सुरू आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत