Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

नंदोरी येथील सेवा सहकारी संस्थांवर भाजपाचे वर्चस्व #Bhadrawati


६५ वर्षांच्या सत्तेला लागला सुरुंग
भद्रावती:- भद्रावती तालुक्यातील नंदोरी (बु.) येथील दोन्ही सेवा सहकारी संस्थांवर किसानपुत्र शेतकरी संघटनेचे जिल्हाध्यक्ष नरेंद्र जीवतोडे आणि जि.प.सदस्या अर्चना जीवतोडे यांच्या नेतृत्वात लढविण्यात आलेल्या पॅनलने आपले वर्चस्व प्रस्थापित केले.
शेतकरी सहकारी संस्था र.नं.६१ येथे ६५ वर्षांचा इतिहास मोडीत काढून भाजपा प्रणित आघाडीच्या बाराही उमेदवारांचा दणदणीत विजय झाला. तसेच शेतकरी सहकारी संस्था र.नं.५१ येथे नरेंद्र जीवतोडे गटाचे ११ उमेदवार निवडून आले. एक उमेदवार अविरोध निवडून आला.तर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे माजी अध्यक्ष शरद जीवतोडे यांच्या गटाचा एक उमेदवार निवडून आला. निवडणूकीनंतर विजयी जल्लोष साजरा करण्यात आला.
दि.१७ एप्रिल रोजी पार पडलेल्या र.नं.५१ या सहकारी संस्थेत निवडून आलेल्या उमेदवारांमध्ये अर्चना जीवतोडे, सुगंधा लांबट, विलास निखाडे, अमोल आगलावे, प्रभाकर केले, नरेंद्र जीवतोडे, मुकिंदा जीवतोडे, रमेश झाडे, सुरेश पुनवटकर, रुपेश बल्की, नामदेव बुरांडे, विठ्ठल मोंढे यांचा समावेश आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत