जाहिरात... Advertisement... विज्ञापन

महिला कनिष्ठ सहायकाला लाच घेताना अटक

लाचलुचपत प्रतिबंधक विभागाची कारवाई
(आधार न्युज नेटवर्क तालुका प्रतिनिधी) रितेश एस. आसमवार, चामोर्शी
चामोर्शी:- चामोर्शी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील महिला कनिष्ठ सहायकाला पंचवीस हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचत प्रतिबंधक विभागाने दिनांक 22 एप्रिल शुक्रवारी अटक केली.
सविस्तर वृत्त असे की, जांभळी ता. धानोरा जि गडचिरोली येथील 32 वर्षीय तक्रारदाराने सेवानिवृत्त वडीलांच्या नावे असलेले निवृत्ती वेतन सातव्या वेतन आयोगाप्रमाणे एरियस ची रक्कम आईच्या नावाने काढून देण्याकरिता चामोर्शी पंचायत समितीच्या शिक्षण विभागातील महिला लिपिक वनिता प्रभाकर तावाडे यांनी तक्रारदाराकडे 30 हजार रुपयांची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची मुळीच इच्छा नसल्याने त्यांनी गडचिरोली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने या तक्रारीची पडताळणी केली असता या पडताळणीत स्वतःच्या आर्थिक फायद्याकरिता भ्रष्ट मार्गाने आरोपी लिपिकाने 25 हजार रुपयांची तडजोडीअंती मागणी केल्याचे स्पष्ट झाले. 25 हजार रुपयांची लाच घेताना आरोपी वनिता तावाडे वय 53 वर्ष यांना 22 एप्रिल शुक्रवारला अटक केली.
या घटनेने शिक्षण विभागात एकच खळबळ निर्माण झाली. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे तपासी पोलीस अधीक्षक सुरेंद्र गरड यांच्या पथकाने केली

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत