Top News

शुल्लक कारणावरून वाद; लोखंडी फावड्याने वार करीत केली हत्या #murder(आधार न्युज नेटवर्क ग्रामीण प्रतिनिधी) जगत सिंग वधावन, राजुरा

राजुरा:- राजुरा तालुक्यातील पंचाळा गावातील शेजाऱ्यात वाद निर्माण झाले होते त्या वादातून रागाच्या भरात लोखंडी फावड्यानी वार करून खून करण्यात आल्याची घटना घडली.

मिळालेल्या माहिती नुसार ड्राइवर चे काम करीत असलेले गणेश मडावी संध्याकाळी 21 एप्रिलला कामावरून घरी आला. गणेश मडावी यांनी घरी असलेले कुत्रे सोडले आणि अंघोळीला गेला असता ते कुत्रे भोंगळे यांच्या अंगणात गेले असता त्या कारणांनी वाद निर्माण झाला, व शिवीगाळ करू लागले व त्या दरम्यान गणेश मडावी यांचे हात प्रभाकर भोंगळे पकडले व रोहित भोंगळे यांनी लोखंडी फावड्यानी गणेश मडावी यांच्या डोक्यावरती वार करून जखमी केले असता त्वरित गणेश मडावी ला उपचारासाठी ग्रामीण रुग्णालय मध्ये नेले असता डॉक्टरनी मृत घोषित करण्यात आला.

नागरिकांनी विरूर पोलीस स्टेशन ला तत्काळ माहिती दिली असता ठाणेदार राहुल चव्हाण व कर्मचारी दिवाकर पवार, मेजर विजय मुंडे, वागदर कर मेजर घटनास्थळी पोहचून मृतक चे पत्नी सुनीता मडावी व गणेश ची आई गीताबाई मारोती मडावी यांच्या बायाना व तक्रार घेऊन आरोपी विरुद्ध 302, 504, 506, 34 अनुसूचित गुन्हा दाखल केला व आरोपी प्रभाकर भोंगळे व वय 52, व रोहित भोंगळे वय 21 आणि एक महिला ताराबाई प्रभाकर भोंगळे या तिघांना अटक करण्यात आले. पुढील तपास विरूर स्टेशन पोलीस स्टेशन चे ठाणेदार राहुल चव्हाण हे करीत आहे.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने