Top News

आ. सुधीर मुनगंटीवार यांच्या संकल्पनेतून साकारला वर्धा येथे जगातील सर्वात मोठा चरखा #wardha


वर्धा:- महात्मा गांधी यांची १५० वी जयंती भारतासह अनेक देशांमध्ये साजरी करण्यात आली सत्य,अहिंसा, स्वावलंबन अशी शिकवण देणार्‍या या महापुरुषाचे सुमारे दहा वर्षे वास्तव्य वर्धा जिल्ह्यातील सेवाग्राम येथे होते.
स्वावलंबनाचा प्रतीक ठरलेल्या चरख्याची जगातील सर्वात मोठी प्रतिकृती महात्मा गांधी यांच्या १५० वी जयंतीच्या निमित्ताने वर्धेत साकारण्याची संकल्पना तत्कालीन राज्याचे अर्थ व वित्त नियोजन तसेच वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री आ. सुधीर भाऊ मुनगंटीवार यांच्या मनात आली वर्धा विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार माननीय डॉक्टर पंकज भोयर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे तसेच वर्धेचे जिल्हाधिकारी श्री शैलेश नवाल यांच्या अथक परिश्रमातून हा जगातील सर्वात मोठा चरखा २ ऑक्टोंबर २०१८ रोजी म्हणजेच महात्मा गांधी यांच्या १५० व्या जयंतीदिनी माननीय आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या हस्ते या चरख्याचा लोकार्पण सोहळा पार पडला.
हा चरखा म्हणजे जगातील सर्वात मोठा चरखा ठरला आहे. जे.जे. स्कुल ऑफ आर्ट्स मुंबईच्या प्राध्यापक व विद्यार्थी यांच्या वीस जणांच्या चमूने केलेल्या सोळा पाती असलेल्या या चरख्यावर महात्मा गांधी यांची सुविचार लिहिण्यात आले आहे, संपूर्ण जगातून सेवाग्राम आश्रमाला भेट देण्यात येणार्‍या पर्यटकांना महात्मा गांधींजींचे सत्य,अहिंसा, शांती व स्वावलंबनाचे विचार प्रभावीपणे पोहोचविण्याचे माध्यम ठरेल ही अपेक्षा करूया.

*- आमदार डॉक्टर पंकज भोयर*

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने