Top News

कुपोषण मुक्त भारत घडविण्यासाठी सकस आहार महत्वाचे:- अल्का आत्राम #chandrapur


चंद्रपूर:- भारतीय जनता पार्टी तर्फे संपूर्ण महाराष्ट्रात सामाजिक न्याय पंधरावाडा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. त्याचाच 19 तारखेला भाजपा महिला आघाडी चंद्रपूर कडे "राष्ट्रीय पोषण आहार" याबद्दल जिल्यात वेगवेगळ्या तालुक्यात विविध गावामध्ये विध्यार्थी, जी प शाळा, अंगणवाडी, प्राथमिक आरोग्य केंद्र, गरोदर माता, स्तनदा माता यांना पोषण आहार बद्दल माहिती देऊन चर्चा करण्यात आली.
तसेच पोंभुर्णा तालुक्यात जिप शाळा चिंताळधाबा, जीप शाळा चेक आष्टा, पोंभुर्णा अंगणवाडी क्र 2,4, 5, अंगणवाडी चिंतलधाबा क्र 3 आणि तालुक्यात इतरही ठिकाणी कार्यक्रम काही ठिकाणी गरोदर मातांना फळ वाटप पौष्टिक आहार मुलांना खाऊ वाटप अंगणवाडी सेविका सत्कार करण्याय आला.
यावेळी जिल्यातील सर्व भाजपा महिला आघाडीचे पदाधिकारी यांनी तळागाळात माहिती पोहचविण्यासाठी उत्तम काम केले. या कार्यकामासाठी अल्का आत्राम जिल्हा अध्यक्ष महिला आघाडी, सौ. दिपाली मेश्राम, रोहोणी देवतळे, रश्मी पेशमे आणि विजयाताई दोहे, वंदना आगरकठे, साईरा शेख सर्व उपाध्यक्ष, सचिव जिल्यातील सर्व महिला आघाडी पदाधिकारी यांनी काम पहिले.

Post a Comment

थोडे नवीन जरा जुने