Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार हेच माझे जीवनदाते chandrapur

उदररोगग्रस्त रुग्णाचे मनोगत

आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मुंबईच्या हिंदुजा रुग्णालयात मोफत उपचार
चंद्रपूर:- घुग्घुस येथील संतोष विठोबा पोतराजे वय ३५ वर्षे हा रोज मजुरीचे काम करीत होता. परंतु जुनाट जठरांत्र मार्गाच्या रोगाने तो त्रस्त झाला, त्यामुळे त्याचा उदरात असह्य दुखणे सुरु झाले. तो खाजगी रुग्णालयात गेला असता त्याला डॉक्टरने शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगितले. जवळपास 4 लाख 50 हजार रुपये शस्त्रक्रियेसाठी लागत असल्याने त्याचे कुटुंब आर्थिक विवंनचनेत सापडले. गरिबीची परिस्थिती असल्याने त्यांना मदतीसाठी भटकावे लागले. त्यांचे नातेवाईक उत्तम व वर्षाताई वडस्कर यांनी संतोष पोतराजे यांची भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांची भेट करून दिली, त्यांनी आपली समस्या दादांना सांगितली. भाजपाचे जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे यांनी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातून सर्वतोपरी मदत मिळणार अशी ग्वाही दिली.
दुसऱ्याच दिवशी संतोष पोतराजे यांना शस्त्रक्रियेसाठी आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रातर्फे मुंबई येथील हिंदुजा हॉस्पिटल येथे पाठविण्यात आले. तिथे भर्ती करण्यात आले व जटिल शस्त्रक्रिया करण्यात आली. संतोष पोतराजे यांना रुग्णालयातून सुट्टी मिळाल्यानंतर ते घरी परतले.
घरी परतल्यानंतर स्वस्थ झाल्यावर आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्रास सहपरिवार भेट दिली व भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे यांची भेट घेतली. मोफत उपचारासाठी मदत केल्याबद्दल आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार, भाजपा जिल्हाध्यक्ष देवराव भोंगळे, भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे व आ. सुधीरभाऊ मुनगंटीवार सेवा केंद्राचे आभार मानले. याप्रसंगी त्यांचे व त्यांच्या कुटुंबीयांचे अश्रू अनावर झाले होते.
यावेळी भाजयुमो प्रदेश उपाध्यक्ष विवेक बोढे, प्रयास सखी मंच अध्यक्ष सौ. किरण बोढे, संतोष पोतराजे त्यांच्या पत्नी व नातेवाईक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत