जाहिरात... Advertisement... विज्ञापन

कराटे स्पर्धेत पोंभुर्णा तालुक्याचे वर्चस्व #pombhurna


स्पर्धेत एक गोल्ड तर दोन सिल्व्हर मेडल, तर डेमो मद्ये पहिले बक्षीस प्राप्त
चंद्रपूर:- चंद्रपूर येथे इंस्पायर स्पोर्टस असोसिएशन चंद्रपुर द्वारा विदर्भ स्तरीय ओपन कूंग-फू कराटे चॅम्पियनशिप नुकतीच पार पडली. या स्पर्धेत अनेक स्पर्धक सहभागी झाले होते. या स्पर्धेत पोंभुर्णा तालुक्यातील उमरी पोतदार येथील खेळाडूंचे वर्चस्व राहिले. या स्पर्धेत एक गोल्ड, दोन सिल्व्हर आणि डेमो पहिले बक्षिस येथील खेळाडूंना प्राप्त झाले. या स्पर्धेत उमरी पोतदार येथील कोमल पेंदोर, स्वप्नील ठाकरे, महेश कुळमेथे, अमित कुंभरे अजिंक्य कुंभरे या सर्वांनी यश संपादन केले.
या ग्रामीण भागातील मुलांना वेळोवेळी मार्गदर्शन करणारे मास्टर मुकेश तांडेकर, मास्टर प्रवीण रामटेके यांच्या अतीपरिष्रमामुळे हे मुले घडत आहेत याचा स्वर्व श्रेय या मास्टर यांना जातो. विशेष म्हणजे या मास्टरांच्या मार्गदर्शनाखाली गेल्या वर्षी सुद्धा या खेळाडूंनी एक गोल्ड, दोन सिल्व्हर आणि डेमो मध्ये यश संपादन केलेले होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत