जाहिरात... Advertisement... विज्ञापन

चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस ॲड सायन्स गोंडपिपरी येथे नॅक चमु बँगलोर ची मुल्यांकनासाठी भेट #chandrapur #gondpipari


गोंडपिपरी:- चिंतामणी कॉलेज ऑफ आर्टस ॲड सायन्स, गोंडपिपरी येथे दिनांक 20 ते 21 एप्रिल 2022 या रोजी, राष्ट्रीय मुल्यांकन आणि प्रमाणन परिषद (नॅक) बँगलोर ची टिम कॉलेजच्या मुल्याकनासाठी भेट देणार आहे. या चमुचे अध्यक्ष मुस्तफा शाहा, समन्वयक डॉ. वेंकटरमण अब्बाराजू तसेच डॉ. मुकतेश कुमार सिंग हे आहेत.
महाविद्यालयाच्या मुल्यांकनाच्या अनुषंगाने आवश्यक ती पूर्वतयारी श्री समर्थ शिक्षण संस्था अहेरी चे सचिव स्वप्नील दोंतुलवार, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सि. ए. निखाडे, IQAC चे समन्वयक डॉ. संजय सिंग, नॅक समन्वयक डॉ. प्रतिक बेझलवार, तसेच कॉलेजचे सर्व प्राध्यापक, शिक्षकेत्तर कर्मचारी यांच्या कडून करण्यात आलेली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत