Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo 

गोंडवाना विद्यापीठाच्या उन्हाळी परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्या:- अजित सुकारे #gadchiroliचंद्रपूर:- गोंडवाना विद्यापीठ गडचिरोली अंतर्गत होऊ घातलेल्या शैक्षणिक सत्र २०२२ च्या उन्हाळी परीक्षा ऑफलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहेत त्या रद्द करून सदर परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावात अशा मागणीचे पत्र अजित सुकारे यांनी महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री, राज्यपाल, उच्च शिक्षण मंत्री, चंद्रपूर जिल्ह्याचे पालकमंत्री, विजय वडेट्टीवार,
चिमूर-गडचिरोली लोकसभा क्षेत्राचे खासदार अशोक नेते, चिमूर विधानसभा क्षेत्राचे आमदार, किर्तिकुमार भांगडिया, जिल्हाधिकारी, यांना पाठविण्यात आले.
पुढील शिक्षणासाठी व नोकरीसाठी विद्यार्थ्यांना निकाल वेळेत मिळाला पाहिजे यासाठी परीक्षा लवकर घेण्यात यावी उन्हाळी सत्राच्या अर्ध्याहून अधिक अभ्यासक्रम ऑनलाइन पद्धतीने शिकवण्यात आला आहे. सोबतच महाराष्ट्र राज्यात नव्याने कोरोना रुग्ण आढळून येत आहेत त्यामुळे एखाद्या विद्यार्थ्याला कोरोनाची लागण झाल्यास ती जबाबदारी कोण घेणार? कोरोणाने महाविद्यालयीन अभ्यासक्रम पूर्ण झाला नसल्याने राज्यातील अनेक विद्यार्थी तणावात आहेत.
छत्तीसगड राज्यात परीक्षा ऑनलाइन पद्धतीने घेण्यात येणार आहे. त्यामुळे या सर्व गोष्टीचा सारासार विचार करून विद्यार्थ्यांचे हित जोपासत गोंडवाना विद्यापीठाच्या परीक्षा सुद्धा ऑनलाईन पद्धतीने घ्याव्यात. राज्यात आरोग्य विभागाने जुन-जुलै महिन्यात कोरोना लाट येण्याची संभावना व्यक्त केली आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ न खेळता विद्यापीठाच्या परीक्षा ऑनलाईन पद्धतीने घ्यावात अशी मागणी श्री.ज्ञानेश महाविद्यालय नवरगाव येथील विद्यार्थी प्रतिनिधी म्हणून अजित सुकारे यांनी केली आहे.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत