जाहिरात... Advertisement... विज्ञापन

संजीवनी फाऊंडेशन च्या तृतीय वर्धापन दिनानिमित्त संजीवनी सांस्कृतिक महोत्सव उत्साहात संपन्न #chandrapur


चंद्रपूर:- महाराष्ट्रच्या हितासाठी सर्वांचाच सेवेसाठी... महाराष्ट्रच्या सामाजिक चळवळीचा मानबिंदू म्हणून संपूर्ण महाराष्ट्रभर कार्यरत असून संजीवनी फाऊंडेशन च्या तृतीय वर्धापदिनानिमित्त संजीवनी सांस्कृतिक महोत्सव व बक्षिस वितरण सोहळ्याचे आयोजन सरदार पटेल महाविद्यालय येथे करण्यात आले होते.
या कार्यक्रम प्रसंगी अध्यक्ष म्हणून सरदार पटेल महाविद्यालयाचे विद्यार्थी प्रिय प्राचार्य डॉ.प्रमोद काटकर, मार्गदर्शक म्हणून मा. श्याम धोपठे, अध्यक्ष,माजी विद्यार्थी संघ बक्षिस वितरक म्हणून कुणाल चहारे प्रदेश महासचिव, एन.एस.यु.आय तसेच प्रमुख उपस्थिती म्हणून महाविद्यालयाचे प्रबंधक, मा.मोहन वनकर, डॉ. कुलदीप गोंड कार्यक्रम अधिकारी व मा.रोहित गाडगे, मा.राजेश बसवेश्वर हजारे विस्तार समिती अध्यक्ष तथा नागपूर विभाग प्रमुख संजीवनी फाऊंडेशन मा. ईजाज इस्माईल शेख उपाध्यक्ष, विस्तार समिती संजीवनी फाऊंडेशन,मा. शुभम निंबाळकर इत्यादि मान्यवर उपस्थित होते.
सदर कार्यक्रमात राजेश बसवेश्वर हजारे यांनी प्रास्ताविक करून संजीवनी फाऊंडेशन च्या कार्याची माहिती दिली.सर्वच मान्यवरांनी संजीवनी फाऊंडेशनच्या तृतीय वर्धापन दिनाच्या शुभेच्छा देऊन मार्गदर्शन केले. कार्यक्रमात मागील तीन दिवसांपासून चालत आलेल्या संजीवनी सांस्कृतिक महोत्सवच्या बक्षिस वितरण सोहळा करण्यात आला. संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर महानगरचा वतीन वक्तृत्व स्पर्धेचा आयोजन करण्यात आला. सदर कार्यक्रमाच्या उत्कृष्ट आयोजन महानगर अध्यक्ष अविनाश चोले, उपाध्यक्ष दर्शन मेश्राम,सचिव रुचिता तोकलवार, कोषाध्यक्ष साहिल चौधरी यांनी केले. तर निबंध व पोस्टर मेकिंग स्पर्धेच्या आयोजन सरदार पटेल महाविद्यालय टीमचे अध्यक्ष सिध्दांत निमसरकार, उपाध्यक्ष, ज्योती निषाद, साचिव मोहिनी चवले, कोषाध्यक्ष समिक्षा कूरेकर यांनी केले. या संपूर्ण स्पर्धेचे बक्षीस मान्यवरांचा हस्ते प्रदान करण्यात आले. डॉ. कुलदीप गोंड यांना संजीवनी क्रीडा प्रशिक्षक पुरस्कार देऊन गौरविण्यात आलं. तर ईजाज इस्माईल शेख यांना संजीवनी समाजभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं.
या कार्यक्रमाचे आयोजन संजीवनी फाऊंडेशन चंद्रपूर महानगर व सरदार पटेल महाविद्यालय टीम च्या वतीने करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचलन आकाश मडावी तर आभार शीतल ताजने यांनी मानले. कार्यक्रम उत्साहात पार पाडला.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत