Aadhar News Network, Bhairav Diwase, chief editor, Adharnewsnetwork, chandrapur, adhar news network logo

नारंडा येथील तलाव खोलीकरणाला सुरवात #Korpana

आशिष ताजणे यांची "मागणी" आणि आधार न्युज नेटवर्क ची "बातमी"

भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांच्या मागणीला यश
कोरपना:- कोरपना तालुक्यातील मौजा नारंडा येथील भवानी माता मंदिराजवळील तलाव खोलीकरणाचे काम दालमिया सिमेंट कंपनीतर्फे सुरू करण्यात आले आहे,सदर तलावाचे खोलीकरण करण्यात यावे याकरिता आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या नेतृत्वात भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने यांनी दालमिया सिमेंट कंपनीकडे मागणी केली होती. सदर बातमी आधार न्युज नेटवर्क ला प्रकाशित करण्यात आली होती. सदर मागणीची दखल घेत तलाव खोलीकरणाला सुरवात केलेली आहे.
तलाव खोलीकरणाच्या कामाचे भूमीपूजन नारंडा ग्रामपंचायतच्या सरपंच अनुताई ताजने यांच्या हस्ते संपन्न झाले.तलाव खोलीकरण झाल्यामुळे पाण्याच्या भूजल पातळीमध्ये वाढ होऊन शेतकऱ्यांना शेती सिंचनाकरिता मदत होईल तसेच गावातील विहिरी व हातपंप यांची सुद्धा भूजल पातळी वाढ होण्यास मदत होईल. तसेच तलावाच्या पारीचेसुद्धा मजबुतीकरण होण्यास मदत होईल.
या कार्यक्रमाला भाजयुमो जिल्हा उपाध्यक्ष आशिष ताजने,सरपंच अनुताई ताजने,दालमिया फॉउंडेशनचे प्रमुख प्रशांत भिमनवार,जय सचदेवा,पंकज गौतम,माजी सरपंच वसंता ताजने,उपसरपंच बाळा पावडे,पोलीस पाटील नरेश परसुटकर ,नागोबा पाटील उरकुडे,प्रवीण हेपट,बापूराव सिडाम,रविंद आगलावे,संतोष वांढरे,सुभाष डवरे,रामदास तिखट,संदीप गंगमवार,संतोष पावडे,अनिल निरे,प्रदीप ऊरकुडे,लक्ष्मण कुळमथे,गौरव वांढरे,रवींद्र कांबळे,शुभम डवरे,मंगल खाडे,बाळा गाडगे,अर्जुन हेपट व गावातील नागरिक उपस्थित होते.

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत